ही एक सोपी पण मस्त गंमतआहे. आपण ठसेकाम करतोच पण त्यातून आता आपलं नाव आपण कोरुया. साहित्य: तुमच्या आवडीचे वेगवेगळे रंग. पांढरा कागद, पेन्सिल, स्केचपेन कृती: 1) एका पांढऱ्या कागदावर तुमचं नाव पेन्सिलने मोठ्या अक्षरात लिहा. मराठीत, इंग्लिशमध्ये किंवा कुठल्याही भाषेत. 2) प्रत्येक अक्षरावर बोटांना निरनिराळे रंग लावून त्यांचे ठसे घ्या. 3) संपूर्ण अक्षरावर ठसे काढून झाले की ते वाळू द्या.
4) वाळल्यावर तुमच्या नावावर पसरलेल्या ठश्यांमधल्या काही ठश्यांना नाक डोळे काढून त्याची कॅरेक्टर्स बनवा. 5) किती मस्त दिसेल तुमचं नाव. आता हा पेपर तुम्ही तुमच्या कपाटावर, खोलीच्या दारावर, किंवा तुम्हाला हवं तिथे चिकटवा. अमुक एक गोष्ट तुमची आहे हे दाखवण्यासाठी हा कागद तुम्ही वापरू शकता.