मी पहिल्या दिवशीच तुम्हाला एक व्यायाम सांगितला होता, ‘ढू’ला पाय लावून पळा म्हणून. तो व्यायाम तुम्हाला फार आवडला असेलच, कारण यापूर्वी क्वचितच तुम्ही तो केला असेल. खरोखरच जर कुत्रं पाठी लागलं असेल तेव्हा! आज असाच एक ‘खत्री’ व्यायाम मी तुम्हाला सांगणार आहे. अनेकांनी आजवर तो करून पाहिलाच नसेल.तुमची पाठ तुम्ही कधी स्वत:च्याच हातानं खाजवली आहे? नसेलच. पाठीला खाज आली की, फार अस्वस्थ होतं. काय करावं असं होऊन जातं. कारण तुमचा हातच पाठीर्पयत पोहोचत नाही! त्यावरची तुमची आयडियाही मला माहीत आहे. अशावेळी तुम्ही एकतर आईला हाक मारता, नाहीतर कंगव्याचा सहारा घेता!.पण आज आपल्याला कोणाचीच मदत घ्यायची नाहीए.
लावा, पाठीला बोट! बघा जमतंय का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 22:37 IST
कोणीच उगाचंच पाठ खाजवायची नाही. हा टाइम्पास नाही, व्यायाम आहे!
लावा, पाठीला बोट! बघा जमतंय का ?
ठळक मुद्देबघा करून आणि सांगा