. इकडे तिकडे उडय़ा मारायला, लोळायला, घरात समजा बेड, पलंग, सोफा अशा वस्तू असतील, तर खाली जमिनीवर पाय न ठेवता, पलंगावरुन बेडवर, बेडवरुन सोफ्यावर, सोफ्यावरुन खुर्ची किंवा टेबलवर. दाराला किंवा कुठेतरी लटकत, उडय़ा मारत आणि चालत जाण्याचा प्रयोगही तुमच्यापैकी अनेकांनी केला असेल. कित्ती मज्जा येते ना त्यात?पण आपल्या आईबाबांनी त्यात नक्कीच मोडता घातला असेल. ढुंगणावर सण्णकन एखादा रट्टाही ठेवला असेल. असलेच काही उद्योग आपण शाळेतही केले असतील आणि सगळ्यांकडून एकच ऐकलं असेल. काय ‘माकडचाळे’ चालवलेत तुम्ही हे? नीट माणसासारखं बसता येत नाही का?पण तुम्हाला सांगू?- या माकडचाळ्यांत किती मज्जा आहे, हे या मोठय़ांना कोण सांगणार? खरं तर असे माकडचाळे त्यांनी स्वत:ही त्यांच्या लहानपणी केले असतील. पण विसरले असावेत आता सगळे. हो, पण उडय़ा मारत आपल्या वस्तू, घर, शाळा खराब करणं चूकच.
काय ‘माकडचाळे’ चालवलेत तुम्ही हे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 07:20 IST
पाहाच करून हे माकडचाळे आणि दाखवा आपल्या आईबाबांनाही. त्यामुळे तुमच्यात किती ताकद आली ते!.
काय ‘माकडचाळे’ चालवलेत तुम्ही हे?
ठळक मुद्देयामुळे हातापायांत ताकद येईल.