- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
सध्या कोविड-19 या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली आहे. घराबाहेर पडण्यामुळे विषाणूची लागण होण्याचा धोका आहे. तो टाळू या. या काळात भाजी फळांची कमतरता झाल्यामुळे आहारात जीवनसत्वे आणि खनिजे कमी प्रमाणात जातात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मयार्दा येते. ती टाळण्याचा एक प्रयोग करू. गव्हाचे तृणांकूर.
1. एक चमचाभर गहू एका सटात घ्या. गहू बुडतील एवढे पाणी घाला. 2. 10 तास भिजू द्या. 10 तासानंतर पाणी काढून टाका. गव्हाला बारीक मोड आलेले दिसतील. 3. एक पसरट ट्रे किंवा कुंडी घ्या. तसा तर तुम्हीच पुठ्ठ्याचा ट्रे बनवू शकाल तर ते वापरता येतील. 4. ट्रेमध्ये अर्धा सेंटीमीटर जाडीचा मातीचा थर करा. त्या थरावर मोड आलेले गहू पसरा. त्यावर पुन्हा माती टाका. 5. रोज त्याच्यावर पाणी शिंपडत रहा असे सात दिवस करायचे आहे. गव्हाच्या तृणांकूराची वाढ कशी होते त्याचे निरीक्षण करा.