शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

घिसते रहो अच्छा लगता है ! -हा भांडी घासायचा खेळ आहे बाबू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 09:58 IST

त्यानिमित्त गारेगार पाण्यात खेळण्याचा चान्स मिळेल, तो का सोडता?

ठळक मुद्देभांडी घासतो या निमित्ताने आपल्याला गारेगार पाण्यात जितका वेळ घालवायला मिळतो तो इतर कुठल्याही कारणाने मिळत नाही.

- गौरी पटवर्धन

तुम्ही कधी भांडी घासली आहेत? मुलींनी कधी ना कधी घासली असतील. काही मुली नेहेमीच घासत असतील. पण मुलग्यांनी? जनरली त्यांनी भांडी घासलेली नसतात. कधीच घासलेली नसतात. अनेक घरात मुलग्यांना आपण जेवलेलं ताट उचलून ठेवायची सुद्धा सवय नसते. ते काम सुद्धा आई, बहीण किंवा वहिनीच करते. पण सध्याच्या परिस्थितीत घरातल्या प्रत्येकावर कामाचा अतिरिक्त ताण आहे. अशा वेळी आपण मदत म्हणून घरातलं एखादं काम करायला काय हरकत आहे?असा विचार केला तर आपल्याला घरातली अनेक कामं दिसू शकतात. गाद्या घालणो / काढणो, घराचा केर काढणो, घर पुसणो, स्वयंपाक करणो वगैरे वगैरे. पण आत्ता तरी आपण फक्त भांडी घासण्याबद्दल विचार करूया. त्याची कारणं तीन. पहिलं म्हणजे ते काम करायला विशेष शिकावं लागत नाही. फक्त कुठलं भांडं घासतांना कुठे लक्ष द्यायचं हे समजून घ्यायला लागतं. म्हणजे चहाचा कप हा कायम जिथे तोंड लावलं जातं तिथे आणि कानाच्या वरच्या आणि खालच्या टोकाच्या मध्ये हटकून खराब होतो. सगळे चमचे, उलथनं, डाव वगैरेंची मागची बाजू, जिथे दांडा चमच्याला मिळतो तिथे कळकट्ट होतात. अश्या प्रत्येक भांड्याच्या घाण राहण्याच्या सीक्रेट जागा असतात. त्या शोधून समजून घेऊन घासाव्या लागतात.दुसरं म्हणजे भांडी घासणो हे काम शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या कॅटेगरीतलं काम आहे. कुठलं भांडं पाण्यात भिजवून ठेवायचं, कुठल्याला साबण लावून ठेवायचा, कुठलं गरम पाण्यात धुवायचं, कुठल्याला प्लॅस्टिकची घासणी आणि कुठल्याला तारेची घासणी याचा विचार करायला लागतो. म्हणजे ते काम सोपं होतं.

तिसरं म्हणजे सकाळपासून सगळ्यांचा स्वयंपाक करून दमलेल्या आईला / बहिणीला किमान नंतरची आवराआवर करायला लागली नाही, तरी त्यांना पुष्कळ आराम मिळतो.आणि आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं! भांडी घासतो या निमित्ताने आपल्याला गारेगार पाण्यात जितका वेळ घालवायला मिळतो तो इतर कुठल्याही कारणाने मिळत नाही. करून बघा! किती वेळ पाण्यात खेळतोयस? ऊठ आता असं कोणीही म्हणणार नाही!