शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

इस्त्री  करोगे भय्या ?- तो लो हो जाओ  शुरु - एकदम कडक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 10:29 IST

आईबाबा लोक आपल्याला कुठलीतरी भंगार कामं चिकटवतात. त्यापेक्षा आपण आपल्याला पाहिजे ते काम मागून घ्यायचं.

ठळक मुद्देइस्त्रीवाला एका कपड्याला इस्त्री करायचे किती पैसे घेतो?

- गौरी पटवर्धन

सुट्टीचा सगळ्यात मोठा वैताग काय असतो? तर आपण घरात खेळलो तर आईबाबा म्हणतात बाहेर खेळा, बाहेर खेळलो की शेजारचे म्हणतात घरात खेळा. त्यात आत्ता तर बाहेर खेळायची काही सोयच नाहीये. त्यामुळे आपण सारखे घरात खेळतो. मग आईबाबा म्हणतात की सारखा काय खेळ? घरात काहीतरी मदत करा. इतका / इतकी लहान आहेस का तू आता? म्हणजे आपण काहीतरी सजेशन द्यायला गेलो की हे लोक म्हणतात की  ‘मोठ्यांच्या मध्ये लहान मुलांनी बोलायचं नाही!’ आणि कामं करायच्या वेळी मात्र आपण मोठे?? भाई वा!एनी वे, ते जाऊदे. घरातली कामं करायलाच लागणार असतील तर ती निदान आपल्या सोयीने करता येतील का ते तरी बघू ना. त्यामुळे सगळ्यात आधी, सगळ्यात महत्वाचं! घरातली कामं करायला नाही म्हणायचं नाही. नाहीतर आईबाबा लोक आपल्याला कुठलीतरी भंगार कामं चिकटवतात. त्यापेक्षा आपण  ‘हो’ म्हणायचं आणि आपल्याला पाहिजे ते काम मागून घ्यायचं. पण असं कुठलं काम असतं जे आपल्याला करावंसं वाटेल? तर कपड्यांच्या घड्या करायच्या आणि कपड्यांना इस्त्री करायची.

कपड्यांच्या घड्या करायला दहा मिनिटं सुद्धा लागत नाहीत, पण आपण एक संपूर्ण काम केल्यासारखं दिसतं. म्हणून ते काम मागून घ्यायचं. आणि त्यातून सगळ्यांचे इस्त्रीचे कपडे वेगळे काढायचे. मस्त गाणी लावायची आणि कपड्यांना इस्त्री करून द्यायची.इस्त्री करायला बराच वेळ लागतो. मग आपण ते काम करायचं? तर जरा विचार करा. एरवी या कपड्यांना इस्त्री कोण करतं? तर ब?्याच ठिकाणी इस्त्रीवाला येऊन कपडे घेऊन जातो, किंवा आपल्यालाच गाठोडं नेऊन टाकायचं आणि घेऊन यायचं काम करायला लागतं. आता विचार करा, इस्त्रीवाला एका कपड्याला इस्त्री करायचे किती पैसे घेतो??? तेवढे पैसे थेट आपल्या पिगी बँकेत जमा करायचे, आलं लक्षात???