आकाशातले तारे बघत बसायला तुम्हाला आवडतं का? कधीतरी आईबाबांनी शुक्राची चांदणी दाखवली की कुतूहल वाटतं का? मंगळावर पाणी असेल का? परजीवी खरंच असतील का? आपल्यासारखं दुसऱ्या एखाद्या ग्रहावर माणूस असेल का? जीव असेल का? आपला त्यांच्याशी संपर्क होईल का असे प्रश्न तुम्हाला आभाळाकडे बघून पडतात?या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तेव्हा मिळतील पण आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून प्रत्यक्ष आकाश, त्यातले डोळ्यांना एरवी न दिसणारे तारे आणि ग्रह बघू शकता. कसे? ह्या घ्या काही युक्त्या-1. त्यासाठी तुम्हाला sky view हे एप डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर तुम्ही संपूर्ण आकाश आणि त्यातले ग्रह तारे सहज बघू शकता. 2. NASA या अमेरिकन संस्थेच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर तिथेही तुम्हाला अवकाशाची, ग्रहताऱ्यांचे सुंदर फोटो बघायला मिळतील. रोजच्या रोज काढलेले फोटोही तिथे अपलोड केलेले असतात जे तुम्ही बघू शकता. 3. आपल्या ISRO च्या साईटवर गेलात तर तुम्हाला भारताची स्पेस मिशन्स, स्पेसक्राफ्ट्स, लॉन्चर्स यांचीही डिटेल माहिती आणि फोटो वाचता, बघता येतील.
घरबसल्या आकाशातले तारे पाहा, अगदी जवळून !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 07:00 IST
घरबसल्या आकाशातून फेरफटका मारायचा असेल, तर तुम्हाला खूप ऑनलाईन रस्ते उपलब्ध आहेत! - ही घ्या यादी!
घरबसल्या आकाशातले तारे पाहा, अगदी जवळून !
ठळक मुद्देआज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?