तुम्हाला किस्से सांगता येतात? जोक्स सांगता येतात? थोडीफार चित्रं काढता येतात? नवीन किस्से किंवा गोष्टी सुचतात? लोकांना शेंड्या लावायला मजा येते? मग आज तुमच्यासाठी एक भारी ?क्टिव्हिटी आहे. तुम्ही तुमचं तुमचं कॉमिक तयार करू शकता.त्यासाठी काही फार लागत नाही. खरं तर कागद आणि पेन्सिल इतकंच साहित्य त्यासाठी लागतं. पण डोकं मात्र भरपूर चालवायला लागतं. आधी तुम्हाला कुठला किस्सा सांगायचा आहे ते ठरवायला लागेल. मग त्यातली पात्र कुठली असतील ते ठरवायला लागेल. मग तो किस्सा कमीत कमी किती चित्रंमध्ये सांगता येईल ते ठरवायला लागेल. मग त्याचं प्रत्यक्ष चित्र काढायला लागेल आणि शेवटी प्रत्येक पात्रचे संवाद लिहायला लागतील.पण हे सगळं वाटतं तितकं काही अवघड नाहीये.