शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भागो ! पण  कसं ? घरातल्या  घरात  कसं  पळणार ? - तर 'असं '!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 14:04 IST

दर आठवडय़ाला थोडं थोडं अंतर वाढवायचं. मग बघा, कसल्लं भारी वाटतं ते.

ठळक मुद्देचला ‘पळपुटय़ांनो’!.

मी रोज तुम्हाला जे व्यायाम शिकवतेय, ते तुम्ही करून पाहताहात ना? नाहीतर मी तुम्हाला शिकवायचं आणि तुमचं आपल्या शाळेतल्या अभ्यासाप्रमाणो! पुढचं पाठ, मागचं सपाट! तर मी सांगितलेले सगळे व्यायाम लक्षात ठेवा, पण सगळे एकाच वेळी करू नका!पण त्याला एक अपवाद आहे. ते म्हणजे वॉर्मअपचे व्यायाम. ते तुम्ही रोज करताहात ना? वॉर्मअप केल्याशिवाय कधीच, कोणताच व्यायाम करायचा नाही, हा एक नियमच तुम्ही बनवून टाका. नाहीतर आपल्या शरीराला इजा होऊ शकते. वॉर्मअपमुळे आपलं शरीर पुढच्या मोठय़ा व्यायामासाठी तयार होतं.आज मी तुम्हाला शिकवणार आहे रनिंग!तुम्ही म्हणाल, रनिंग ही काय शिकायची गोष्ट आहे का? मी पाहिलंय तुम्हाला अनेकदा, ‘ढू’ला पाय लावून पळताना, पण ते बरोबरच असेल, असं नाही. नीट शास्त्रीय पद्धतीनं पळालं नाही, तर दुखापत होऊ शकते. 

सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला पळायला फार जागा नाही,  पण त्यातल्या त्यात थोडी मोठी जागा, आपल्या बिल्डिंगची टेरेस. इत्यादि ठिकाणी तुम्ही धावू शकता. 

 

कशी कराल रनिंग?

1- आधी आपल्या पायात, आपल्या मापाचे, रनिंगचे थोडे चांगले शूज घालायचे. थोडं वॉर्मअप, जॉगिंग आणि मग रनिंग.2- पळताना समोर बघायचं, पाठ ताठ. किंचित थोडंसं पुढे झुकलेलं.3- पळताना आपल्या हाताचा नव्वद अंशाचा कोन झाला पाहिजे. ते अगदीच गबाळेपण सोडायचे नाहीत आणि एकदम घट्ट पण धरून ठेवायचे नाहीत.4- टाचेवर पळायचं नाही आणि बोटांवरही पळायचं नाही.  पळताना आपल्या पायाचा पुढचा भाग; ज्याला ‘मिडफूट’ म्हटलं जातं, तो अलगदपणो जमिनीवर टेकला पाहिजे. पाय न आपटता पळायचं.5- दर आठवडय़ाला थोडं थोडं अंतर वाढवायचं. मग बघा, कसल्लं भारी वाटतं ते.

तुमचीच ‘पळपुटी’ फ्रेंड, - ऊर्जा