सुपरमॅन पिक्चर, सिरीज, काटरुन यांपैकी तुम्ही काय पाहिलंय?काय भारी आहे ना? कसा हवेत उडतो. आपल्यालाही वाटतं, आपणही असंच हवेत उडावं. पिक्चर पाहता पाहताच आपण मग मनातल्या मनातच उडायला लागतो. या गावावरून त्या गावाला!आपल्याला आज खरंच उडायचं आहे. एकदम सुपरमॅनसारखंच.तुम्ही म्हणाल, काय शेंडय़ा लावतेय ऊर्जा तू. बरं, ठीक आहे, मी तुम्हाला सांगूनच टाकते. सुपरमॅनसारखं आपल्याला कसं उडायचंय ते!बरोबर. तुम्ही म्हणताय, तसं आपल्याला खरोखरच उडायचं नाहीय, तशी अॅक्शन आपल्याला करायचीय. पण आधीच सांगून ठेवते, निदान सुरुवातीला तरी फार भारी वगैरे वाटणार नाही, पण इतरांपेक्षा तुम्हाला चांगलं जमत असेल, तर मात्र खरंच फार मस्त वाटेल. कसं बनाल ‘सुपरमॅन’?
आज उडायचं का आपण सुपरमॅनसारखं ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 07:50 IST
हा एक फार म्हणजे फारच भारी व्यायाम आहे!
आज उडायचं का आपण सुपरमॅनसारखं ?
ठळक मुद्देबघा, हा व्यायाम करून. काही दिवसांनी तुम्हालाही एकदम सुपरमॅन झाल्यासारखं वाटेल!