शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

स्लो सायकलिंग करता का ? ते पण इनडोअर - फन  मोअर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 12:28 IST

मी सायकल काढायला सांगितली म्हणजे एकदम बाहेर, रस्त्यावर नाही काढायची!

ठळक मुद्देया खेळामुळे तुमचा सायकलवरचा होल्ड, बॅलन्स जबरदस्त वाढेल. एकाग्रता वाढेल.

 घरी बसून बसून एकदम बोअर झालंय. व्यायाम तरी किती करायचा, असं झालंय  तुम्हाला? ठीक आहे, मग आज आपण एक एकदम मजेचा खेळ खेळू. या खेळाची मजा म्हणजे यात तुम्ही तुमचे आई-बाबा, दादा-ताई अगदी सगळ्यांना सहभागी करून घेऊ शकता!तुमच्यापैकी ब:याच जणांकडे सायकली असतीलच. तुमची स्वत:ची नसेल, तर दादाची,  ताईची अशी कोणाची तरी असेलच ना?काढा ही सायकल. आधी स्वच्छ पुसून काढा. बरेच दिवस झालेत ती धूळ खात पडली असेल ना? हो, मी सायकल काढायला सांगितली म्हणजे एकदम बाहेर, रस्त्यावर नाही काढायची! आपला हॉल जर मोठा असेल, तर हॉलमध्ये ही सायकल आणा. नाहीतर बेस्ट वे म्हणजे सरळ गच्चीवर न्या. पण आधी त्यासाठी आईबाबांची परवानगी घ्या. टेरेसचे कठडे व्यवस्थित उंच आहेत ना, ते बघा. आईबाबांनी परवानगी दिली तरच वर न्या सायकल. पण लक्षात घ्या, तिथेही उगाच गर्दी करायची नाही.कशी चालवायची ही सायकल?1- ही आहे स्लो सायकलिंग.2- म्हणजे अतिशय हळू सायकल चालवायची3- जसं काही आपण जागेवरच उभं आहोत.4- तुम्ही सगळेच भारी सायकलिस्ट आहात, हे मला माहीत आहे, पण स्लो सायकलिंग तुम्ही कधी केलं नसेल.5- या खेळाचं वैशिष्टय़च हे आहे, कुठेही तुम्ही ही सायकलिंग करू शकता.6- लक्षात ठेवा, फास्ट सायकलिंग करणं एकवेळ सोपं आहे, पण स्लो सायकलिंग फार म्हणजे फार अवघड आहे. 7- पाय न टेकवता एक मिनिट अशी सायकल चालवणं आणि कमीत कमी अंतर कापणं ही फार म्हणजे फार अवघड गोष्ट आहे. लक्षात ठेवायचा, आणखी एक नियम म्हणजे पडायचं नाही. सायकलिंगचं हेल्मेट असेल, तर ते अवश्य वापरा. इतर वेळी बाहेर जातानाही हेल्ेमेट अत्यावश्यक आहे. या खेळामुळे तुमचा सायकलवरचा होल्ड, बॅलन्स जबरदस्त वाढेल. एकाग्रता वाढेल. मसल्स पॉवर वाढेल. स्ट्रेस लेवल तर कमी होईलच, पण फार मज्जाही येईल.- तुमचीच ‘सायकलवाली’ फ्रेण्ड ऊर्जा