रंगीत पाण्याला पुन्हा रंगहीन करण्याचा प्रयोग तुम्हाला बघायचा आहे? सारखं आर्ट आणि क्राफ्ट करून कंटाळा येतो ना, मग आता आपण काही वैज्ञानिक प्रयोग करून बघूया, एकदम सोपे सोपे. आणि झटपट होणारे. साहित्य: दोन प्लॅस्टिक कप्स, फूड कलर. शक्यतो लाल. ब्लिच, पाणी. कृती :1) एक प्लॅस्टिक कपमध्ये तीन चतुर्थांश पाणी भरा. 2) त्यात लाल फूड कलरचे काही थेंब टाका. 3) दुस?्या प्लॅस्टिक कपमध्ये पाव कप ब्लिच घ्या. 4) हळूहळू ब्लिच पाणी असलेल्या कपमध्ये सोडा. ही क्रिया अतिशय सावकाश करायची आहे. 5) आता गंमत बघा, जसं तुम्ही ब्लिच रंगीत पाण्यात सोडाल,ा आणि पाणी हलकेच ढवळाल तसतसे रंगाचे रेणू पाण्याच्या रेणूपासून विलग होतील आणि पाणी क्लिअर दिसायला लागेल.
रंगीत पाण्याचा रंग काढून टाकता येतो का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 07:10 IST
दुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग
रंगीत पाण्याचा रंग काढून टाकता येतो का?
ठळक मुद्देरंगीत पाण्याची जादू