विशिष्ट दिवसात फ्लेमिंगो हा पक्षी दिसतो. अगदी शेकडोंच्या थव्यानं. आपल्याजवळ जर दुर्बिण असेल तर फारच उत्तम. ऊंच मान आणि लांब पाय असलेला, गुलाबी पिसं असलेला हा पक्षी दिसायलाही फारच छान आहे. शेकडोंच्या थव्यानं एकाचवेळी ते आकाशात उडत असताना पाहणं म्हणजे तर एकदम पर्वणी!याच पक्ष्यांना मराठीत ‘रोहित’ म्हटलं जातं. पाण्यांत ते जेव्हा ते उभे असतात, तेव्हा त्यांना तुम्ही कधी पाहिलं आहे? बगळ्याप्रमाणो ब:याचदा एकाच पायावर ते उभे असतात. त्यांची चोच विशिष्ट आकाराची असते. त्यामुळे चिखल आणि गाळ त्यांना वेगळा काढता येतो. भक्ष्यांना पकडणं सोपं जातं. याच चोचीनं ते चिखलाचं घरटंदेखील बनवतात. हा स्थलांतरित पक्षी आहे. पुण्याजवळील उजणी धरण, नाशिक जिल्ह्यातील नांदुरमधमेश्वर इत्यादि ठिकाणी हा पक्षी सिझनमध्ये शेकडो, हजारोंच्या संख्येनं पाहायला मिळतो.या पक्ष्याची जी लकब आहे, त्याचाच अभ्यास करुन तज्ञांनी व्यायामाची एक अनोखी पद्धत शोधून काढली आहे, त्याल म्हणायचं, ‘फ्लेमिंगो एक्सरसाइज’.हाच व्यायाम आज आपण करून पाहू.कसा कराल हा व्यायाम?1- सोप्पं आहे. एका पायावर उभे राहा.2- दुसरा पाय थोडा तिरका करा.3- आपलं शरीर ताठ ठेवा.4- नजर समोर.5- असंच पुन्हा दुस:या पायानं करा.6- एक पाय अधांतरी, दुस:या पायाच्या मांडीला टेकवून, मागच्या बाजूला. अशा खूप पद्धतीनं अगदी बसूनही हा व्यायाम तुम्हाला करता येईल.यामुळे काय होईल?1- तुमचे कोअर मसल्स मजबूत होतील.2- सिक्स पॅक अॅब्जसाठीही उपयुक्त.3- शरीराचा बॅलन्स अतिशय सुधारेल.4- मेंदूला चालना मिळेल.5- अशा पद्धतीनं नुसतं उभं राहूनही तुमच्या ब:याच कॅलरीज जळतील.सुंदर पक्ष्याचा हा सुंदर व्यायाम तुम्हालाही नक्कीच सुंदर, आकर्षक आणि बळकट बनवेल. अगदी नक्की. पाहा करुन.
फ्लेमिंगो पक्ष्याची कॉपी मारून करायचा भारी व्यायाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 16:55 IST
या पक्ष्याची जी लकब आहे, त्याचाच अभ्यास करुन तज्ञांनी व्यायामाची एक अनोखी पद्धत शोधून काढली आहे.
फ्लेमिंगो पक्ष्याची कॉपी मारून करायचा भारी व्यायाम
ठळक मुद्दे‘फ्लेमिंगो एक्सरसाइज’.