शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ऑनलाईन पहिल्यांदाच शिकवत असलेल्या शिक्षकांसाठी काही साध्या-सोप्या युक्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 16:52 IST

व्हर्चुअल वर्ग’ चालवण्यासाठी करून पाहाता येतील असे प्रयोग

ठळक मुद्देकाय काय कराल?

ऑनलाइन शिकवणं हे नेहमीच्या शिकवण्यापेक्षा वेगळं आहे हे तर उघड आहे.अनेक शिक्षकांना हा नवा अनुभव हवासा वाटत असेल, काहींना नोकरी टिकवायची तर जुलमाचा रामराम वाटत असेल. वाटो काहीही, ऑनलाइन शिकवणं जर पुढयात असेल तर त्याचा विचारही नव्या रीतीनं करायला हवा. ऑनलाइन शिकवणं म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही, सरावानं, आपलं आपण शोधत नव्या पध्दती त्यातही सापडतील.मात्र तोवर हाताशी असाव्यात म्हणून या काही अगदी सोप्या, हाताशी असाव्यात अशा टिप्स.करुन पहा. सहज जमेल. तंत्र माणसाशी मैत्री करायला तयार असतंच, माणसांनी तंत्रशी जमवून घ्यायला पाहिजे.1. रेकॉर्ड करा.ऑनलाइच  शिकवा म्हणजे लाइव्ह, पण ते करताना ही शक्यताही गृहित धरायला हवीच की कुणा मुलाला तेव्हा कळलं नसेल, कदाचित नेटच नेमकं गेलं असेल, त्याला बरं नसेल, घरातलं वातावरण साजेसं नसेल, तर त्याला ते लेक्चर पुन्हा ऐकता, पाहता आलं पाहिजे. त्यामुळे लाइव्ह जातानाच आपलं लेक्चर रेकॉर्डिगला लावा. रेकॉर्ड करा, मुलांना पाठवा. याचे दोन फायदे! मुलांना ते लेक्चर पुन्हा पाहता येऊ शकेल, आणि दुसरा फायदा म्हणजे तुम्हालाही ते पुन्हा रिव्हाइज करुन आपल्या काय चुका झाल्या हे पाहून, त्या पुन्हा टाळता येतील.

2. चेहरा दाखवा.अनेकजण आता पीपीटी करत आहेत, तास चालू असताना ऑनलाइन व्हीडीओ दाखवत आहेत. मात्र नुसतं ते प्रेङोण्टिंग मोडवर शिकवणं नको, तुमचा चेहरा दाखवा. तुमच्या चेह:याकडे पाहून, तुमच्या विदद्यार्थी जास्त कनेक्ट करू शकतील.

3. मेक इट शॉर्टतुम्ही जर व्हिडीओ करुन ते मुलांना दाखवणार असाल तर ते छोटे ठेवा, 10 किंवा 15 मिनिटांपेक्षा जास्त नको. एकतर मुलांचा अटेंशन स्पैन. दुसरं म्हणजे फाईलची साइज मोठी होते, अपलोड, डाऊनलोडला प्रॉब्लम येतो. त्यामुळे दोन-तीन-चार छोटे व्हिडीओ करा. मोठे नकोच.

4. फॉण्ट चेकतुम्ही ज्या स्लाइड मुलांना दाखवाल त्या एकदा स्मार्टफोनवर बघा. त्यांचा फॉण्ट वाचता येतोय का पहा. बरीच मुलं मोबाइलवर शिकतात, टॅब किंवा लॅपटॉप सगळ्यांकडेच नसतो. म्हणून मग मोबाइलवर तो फॉण्ट दिसला पाहिजे.

5. सगळं स्वत:च? कशाला?आपणच सगळे व्हिडीओ करू, जास्त सोपं करू, जास्त टेकसॅव्ही होऊ असा लोड घेऊ नका. इंटरनेटवर अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत, स्लाइड्स, फोटो आहेत, त्या वापरा. कमी वेळात जास्त करण्यापेक्षा, थोडंच वेगळं करा. अजून बरंच काही, उद्याच्या अंकात