ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग
सारखं सारखं क्राफ्ट करून कंटाळा येतो ना, मग आज आपण एक मस्त सॅलड करूया. डीआयवाय मध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टीही तुम्ही पुष्कळ करू शकता. साहित्य: कलिंगड, चीज, मिरपूड, प्लेट कृती: 1) कलिंगडाचे चौकोनी तुकडे करून घ्या. हे जरा स्किलच काम आहे पण तुम्हाला जमेल. चौकोनी ठोकळा कापा. 2) त्याच आकाराचा चीज स्लाईसचा तुकडा कापून घ्या. 3) आता कलिंगडाच्या चौकोनावर चीज स्लाइस ठेवा. 4) त्यावर मिरपूड भुरभुरवा.