शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

शेंगदाण्याच्या कुटाची चिक्की, करके देखो इझी है !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 16:00 IST

भूक भूक ? आपणच एखादी सोप्पी मज्ज बनवली तर?

ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

आपण सारखे घरात अडकून पडलो की एक मोठाच प्रॉब्लेम होऊन बसतो. म्हणजे बरेच प्रॉब्लेम्स होतात. पण हा त्यातल्या त्यात मोठा प्रॉब्लेम असतो. आणि तो जितका आपल्याला असतो, तितकाच आईला पण असतो. त्यामुळे तो अजूनच गंभीर होऊन बसतो. कुठला माहितीये?भूक!आपल्याला सतत, दर थोड्या वेळाने लागणारी वेगवेगळ्या पदार्थांची भूक ही आपल्या आणि आईच्याही दृष्टीने मोठीच डोकेदुखी असते. कारण आपल्याला भूक तर असते, पण त्यावेळी पोळी भाजी, आमटी भात असलं काही आपल्याला नको असतं. आधीच आईला सध्या जास्त काम पडत असल्यामुळे तीही वैतागते. आणि शेवटी आपल्याला सांगते,  ‘खरी भूक असेल तर भाजी पोळी खा!’तर त्यापेक्षा मध्ये मध्ये खायला आपणच काहीतरी बनवलं तर? एक एकदम सोप्पा आयटम आहे. तो म्हणजे शेंगदाण्याच्या कुटाची चिक्की.त्यासाठी एक वाटी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा. अर्धी वाटी साखर घ्यायची. आपल्याला चिक्की करायला सुरुवात करण्याच्या आधी एका ताटाला आणि वाटीला थोडा तुपाचा हात लावून ठेवायला लागेल. कारण चिक्की फार पटकन होते आणि ती झाल्याच्या नंतर हे सगळं करायला वेळच नसतो. शिवाय एका सुरीला पण तूप लावून ठेवा.

आता एका कढईत अगदी चमचाभर तूप घाला. त्यात साखर घाला. गॅस चालू करा, पण तो मध्यम किंवा बारीक ठेवा. जरा वेळात सगळी साखर वितळेल, ती वितळेपयर्ंत सतत हलवत रहा. साखर वितळली की त्यात शेंगदाण्याचा कूट घाला. तो पूर्ण मिसळला की गॅस बंद करा आणि ते मिश्रण ताटात लावून ठेवलेल्या तुपावर ओता आणि तूप लावलेल्या वाटीने एकसारखं पातळ थापा. ते गार व्हायच्या आत तूप लावलेल्या सुरीने त्याच्या वड्या पाडा.ही चिक्की करायला अक्षरश: पाच मिनिटं लागतात आणि नंतर ती गार व्हायलाही पाचच मिनिटं लागतात. शक्यतो सुरुवातीला घरातल्या कुठल्यातरी मोठ्या माणसाला बरोबर घेऊन हा उद्योग करा. आणि मग गंमत बघा. काही दिवसांनी घरातली मोठी माणसं तुमच्याकडे चिक्कीची फर्माईश करायला लागतील!