शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

मास्क चढवून, सिंह गर्जना करत घरातल्या सगळ्यांना घाबरवून सोडा, आहे की नाही धम्माल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 17:07 IST

पेपरप्लेट सिंह

ठळक मुद्देबनवायला अगदी सोप्पा आणि घाबरवायला पण!

घरात जुन्या पेपर प्लेट असतातच, वाढदिवसाला आणलेल्या आणि शिल्लक राहिलेल्या. त्यापासूनच आपण सिंह बनवूया. हा सिंह तुम्ही नुसताच तुमच्या खोलीत लटकवू शकता किंवा त्याचा मास्कही बनवू शकता. साहित्य: पेपर प्लेट, कात्री, पिवळा आणि चॉकलेटी रंग, काळं स्केचपेन, पंचिंग मशीन आणि दोरा. कृती: 1) पेपर प्लेटला बाहेरच्या बाजूने माकिर्ंग असतं. एक प्रकारचं डिझाईन. छोटे फोल्ड्स असतात. त्या प्रत्येक फोल्डने तयार झालेल्या रेषांवर इंचभर कापून घ्या. संपूर्ण पेपर प्लेट ला असे कट घेतलेत कि झाली सिंहाची आयाळ. 2) आता पेपर प्लेट पिवळ्या रंगाने रंगवून घ्या. 3) आयाळ पिवळसर चॉकलेटी रंगाने रंगवा. 4) रंग वाळू द्या. 5) पेन्सिलने सिंहाला डोळे, तोंड, मिशा काढा आणि काळ्या स्केच पेनने त्यावर गिरवा. म्हणजे चेहरा उठावदार दिसेल. 6) आता या पेपर प्लेटच्या मध्यावर पण प्लेटच्या टोकांशी दोन्ही बाजूंना एक एक छिद्र पाडून घ्या. 7) सिंहाच्या तोंडाच्या विरुद्ध दिशेने जाईल असा दोरा ओवा. 8) आता तुम्ही तुमचा सिंह तुम्हाला हवा तिथे लटकवू शकता. 

9) मास्क बनवायचा असेल, तर मोठ्यांच्या मदतीने डोळ्याची जागा कापा आणि दोरा डोक्याच्या आकाराने बांधून घ्या. 10) मास्क चढवून, सिंह गर्जना करत घरातल्या सगळ्यांना घाबरवून सोडा, आहे की नाही धम्माल!