शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

खरंच !! आनंद बरणीत भरून, साठवून ठेवता येतो ! पटकन आणा तुमची बरणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 18:48 IST

घरचे तुम्हाला पिसाळून सोडतायत ना, चला, आज बनवा आनंदाची बरणी!

ठळक मुद्देकाही चांगल्या गोष्टी पण घडतायत. बरेचदा आपल्याला तेवढी आठवणही पुरेशी असते मूड चांगला व्हायला. 

- गौरी पटवर्धन 

सध्याचा सगळ्यात मोठा वैताग काय आहे? तर काहीच आपल्या मनासारखं होत नाहीये. काहीच चांगलं होत नाहीये. बाहेर जाता येत नाही. मित्रंना घरी बोलवू शकत नाही. हवं ते खाता येत नाही. आईवडील सारखे घरात असतात त्यामुळे त्यांचं सारखं आपल्यावर लक्ष असतं आणि ते सारख्या आपल्याला सूचना देऊन पिसाळून सोडतायत. कधीही बोअर होतंय म्हंटलं की   ‘‘अभ्यास कर / पुस्तकं वाच / आधी तो फोन खाली ठेव’’ असलं काहीतरी सांगतायत. किंवा  ‘आमच्या लहानपणी’ ची कॅसेट वाजवतायत. आजीआजोबांना बाहेर फिरता येत नाही म्हणून ते चिडचिडे झालेत आणि सगळ्यांना राग काढायला आपण एकटेच सापडतोय!पण हे सगळं आपल्याला वाटतंय तितकं खरंच वाईट आहे का? का यातपण थोडं थोडं चांगलं काहीतरी होतंय आणि आपण त्याच्याकडे बघत नाही आहोत? ते ठरवायचं कसं? तर हॅपिनेस जार मधून! म्हणजे अक्षरश: आनंदाची बरणी!काय करायचं, तर आईकडून एक छोटी बरणी मिळवायची. ती तुम्हाला कोणीच काचेची देणार नाही त्यामुळे ती प्लॅस्टिकची पण चालेल. त्याच्या झाकणाला एक छोटी फट तयार करायची. पिगी बँकला असते तशी. मग घरातले सगळे रंगीत कागद गोळा करायचे. घरात रंगीत कागद नसतील तर वॉटर कलर्सनी रंग देऊन, त्यावर डिझाईन काढून आपण ते कागद तयार करायचे. आणि मग, तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं होईल ते एका चिट्ठीवर लिहायचं. त्याची घडी करायची आणि त्या बरणीत टाकून द्यायची.

या चिठ्ठयांमध्ये काय काय असू शकेल? तर 1. बाल्कनीत ठेवलेल्या पाण्यात चिमण्या येऊन अंघोळ करून गेल्या.2. रस्त्यावर राहणा?्या कुत्र्याला पोळी घातल्यामुळे त्याची तुमची दोस्ती झाली.3. आज छान चित्र काढता आलं.4. आज मी पहिल्यांदाच पोळी केली.असलं काहीही छान घडलेलं तुम्ही त्या चिट्ठीवर लिहू शकता. आता या बरणीचं काय करायचं? तर ती सांभाळून ठेवायची. तिच्याकडे बघितलं की तुमच्या लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला सगळंच काही वाईट घडत नाहीये. काही चांगल्या गोष्टी पण घडतायत. बरेचदा आपल्याला तेवढी आठवणही पुरेशी असते मूड चांगला व्हायला.