शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

घाला साष्टांग दंडवत आणि झाला तुमचा व्यायाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 22:38 IST

तुम्ही ‘हे’ करत असताना समजा आई तुमच्या समोर आलीच, तर ती एकदम खुषच होईल!

ठळक मुद्देतुमचा थकवा कुठल्याकुठे पळून जाईल. मग पळवाच तुमचा हा थकवा आणि आळसही.

 येतेय की नाही मज्जा व्यायामाला?मला माहितीये, तुम्ही म्हणाल, ‘हा काही व्यायाम आहे का? ही खरंच नुस्ती मज्जा आहे. आणि सोप्पी पण आहे. अशी धम्माल करायची, यालाच व्यायाम म्हणतात, असं जर कोणी आधीच आम्हाला सांगितलं असतं, तर आम्ही कधीचेच नसतो का व्यायामाला लागलो? आम्हाला आधी वाटलं होतं, व्यायाम करायचा, म्हणजे जीममध्ये जायचं, ती मोठमोठ्ठी वजनं उचलायची, अंगातले कपडे ओले होईर्पयत घाम गाळायचा आणि नंतर हाशहुश्श करत बसून घ्यायचं!’बरोबर ना, असंच वाटलं होतं ना तुम्हाला? खरंतर त्याला व्यायाम म्हणतच नाही. मी तर त्याला हमाली म्हणते! आणि एवढीच तुम्हाला वजनं उचलायची हौस असेल तर घरातली कामं करा ना! घरातल्या त्या मोठमोठय़ा वजनदार गाद्या उचलून उन्हात घाला, धान्याची पोती गच्चीवर नेऊन तिथे धान्य वाळत घाला! फ्रीज, बेडखाली किती धूळ असते, ती सरकवून त्याखालची धूळ साफ करा. मग तुम्हाला जीममध्ये जाऊन वजनं उचलण्याची गरजच पडणार  नाही. शिवाय तिथे जाऊन किती पैसे वाया घालवतात ही मोठी माणसं! आणि घरी आल्यावर ‘थकलो’ म्हणून पुन्हा ठिय्या‘जाऊ दे ते मोठय़ांच्या व्यायामाचं.आज मी तुम्हाला आणखी एक भारी व्यायाम शिकवते.

या व्यायामाचं नाव आहे ‘साष्टांग दंडवत’!

आई-बाबांना तुम्ही दाखवाच एकदा हा व्यायाम करून. पण हा काही खरोखरचा नमस्कार नाही हं. तसा दिसतो तो फक्त.खाली बसायला एक जाड मॅट घ्या. म्हणजे टोचणार नाही. आता पाय मागे घेऊन टाचेवर बसा. पायांची बोटं जुळलेली असू द्या. आता हळूहळू पुढे वाका, पाठ सरळ ठेऊन हात पुढे न्या आणि डोकंही जमिनीला हलकेच टेकवा. असं करत असताना समजा आई खरंच समोर उभी असेल, तर तिला वाटेल, आपण तिला नमस्कारच करीत आहोत! पण हे पाहताना तिलाही नक्कीच आनंद होईल. लक्षात घ्या, पुढे वाकत असताना आपलं आपलं ‘ढू’ आणि मांडय़ा थोडय़ा मागे खेचायच्या, पण जागेवरुन हलायचं मात्र नाही! आहे की नाही मज्जा!या व्यायामामुळे तुमच्या मांडय़ा, घोटे, पाठ आणि ‘ढू’ला ताण मिळेल. त्यामुळे तुम्हाला एकदम छान तर वाटेलच, पण समजा एखादेवेळी आईला मदत करून, खेळून तुम्ही खरोखरच खूप  दमला असाल, तर हा व्यायाम केल्यावर तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटेल. तुमचा थकवा कुठल्याकुठे पळून जाईल.मग पळवाच तुमचा हा थकवा आणि आळसही.- तुमची ‘साष्टांग’ मैत्रीण, ऊर्जा