शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतली ही चार भावंडं कुणाला पाठवतात ग्रीटिंग ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 07:19 IST

मॅडलिन, ऑलिव्हिया, कॅमेरॉन आणि ज्ॉक ही चार भावंडं आत्ता अमेरिकेत काय करत असतील?

ठळक मुद्देही मुलं अजून खूप ग्रीटींग कार्ड बनवणार आहेत.

 मॅडलिन, ऑलिव्हिया, कॅमेरॉन आणि ज्ॉक फ्रान्स ही चार सख्खी भावंडं. अमेरिकेत राहातात. लॉक डाऊनमुळे अख्खं जग काहीही काम न करता घरात बसून आहे. पण ही चार भावंडं मात्र खूप बिझी आहेत. ही मुलं सध्या ग्रीटींग कार्ड बनवत आहेत. शाळेला कोरोनामुळे सुटी मिळाल्यामुळे आता काय करायचं असा प्रश्न या चौघांनाही पडला. मग त्यांनी ठरवलं की आपण असं काहीतरी बनवू या ज्यामुळे इतरांना आनंद होईल. म्हणून त्यांनी ग्रीटींग कार्ड बनवण्याचं ठरवलं.  ही ग्रीटींग कार्ड ती त्या लोकांना वाटत आहे जे आज कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे घरात बंद आहेत. 

अॅनाबेला आणि दानिका ही मावस भावंडंही या चौघांची मदत करत आहेत. या सगळ्या मुलांना हस्तकलेच्या वस्तू तयार करण्याची खूप हौस आणि इतरांना खूष करण्याची आवडही.  या दोन गोष्टींची सांगड घालून  ही भावंडं आपलं काम करत आहेत. या चौघांना त्यांची आई व्हेनेसा फ्रान्सकडून कळलं की कोरोना व्हायरसच्या संसर्ग झाल्यानं  एकटे राहणारे रूग्ण सध्या खूप निराश आणि दुखी आहेत.  हे ऐकून या मुलांना या रूग्णांसाठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली.  त्यांच्या या कामामुळे त्यांची आई, नातेवाईक आणि त्यांच्या शेजारच्यांनाही त्यांचं खूप कौतुक वाटत आहे. ही मुलं अजून खूप ग्रीटींग कार्ड बनवणार आहेत. त्यांची आई म्हणते अजून त्यांच्याकडे खूप कागद आहेत.