- श्वेता देशमुख
तुम्हाला माहीत आहे का मुलांनो, कोरोना हा काही नवा व्हायरस नाहीये. माणसाला या व्हायरसची माहिती 1960 सालापासून आहे. कोरोना व्हायरस हा शब्द लॅटिन शब्द कोरोनावरून घेतलेला आहे. कोरोनाचा लॅटिन अर्थ क्राउन किंवा मुकुट. या व्हायरसला सगळीकडे मुकुटाला असतात तशी टोकं असतात. हा व्हायरस प्राण्यांमधून माणसांमध्ये शिरतो. सध्या ज्या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे आणि तुम्हाला घरात अडकवून ठेवलं आहे तो व्हायरस या मूळ कोरोनाचंच नवं रूप आहे. म्हणून डब्ल्यूएचओने या नव्या स्वरूपातल्या कोरोनाला कोविड 19 म्हटलं आहे.
हा व्हायरस जाणार कधी?कोरोना 1960 पासून माणसाला माहीत आहे. म्हणजे 1960 पूर्वीही तो होता आणि यानंतरही तो असेल. त्यामुळे या व्हायरसला पूर्णपणे नष्ट करता येऊ शकत नाही. पण शास्रज्ञ आणि या विषयातले तज्ज्ञ यावर लस शोधत आहेत. त्याच्या चाचण्याही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच याची लास उपलब्ध होईल आणि त्यापासून माण्सांना आपलं संरक्षण करता येईल.