शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

coronavirus : कोरोनामुळे आपण  सगळे मरून  जाऊ का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 16:11 IST

कोल्हापूरच्या मयूरने विचारलंय, की आता कोरोनामुळे खरंच खूप माणसं मरतील का?

ठळक मुद्देकाही महत्त्वाच्या गोष्टी आपण मिळून केल्या तर आपण या व्हायरसला पळवून लावू शकतो.

मी सतत टीव्हीवर बातम्या बघतो आहे, मला खूप भीती वाटते आहे. मला वाटतंय की आता अख्ख्या जगात खूप माणसं मरणार. असं खरंच होईल का?- मयूर, कोल्हापूर

मयूर, तू तुझ्या मनातली भीती ऊर्जाला कळवलीस त्याबद्दल खूप खूप थँक यू मि त्रा. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होणारा हा आजार झपाटय़ाने पसरणारा आहे; पण घाबरून जायचं कारण नाही. ऊर्जा तुम्हा मुलांना नेहमीच प्रामाणिकप णे उत्तरं देते त्यामुळे याबाबतही उगाच काहीबाही सांगणार नाही. हो, जगभर या आजाराने अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत हे खरं आहे. पण त्यामुळे आजार झालेले सगळेच मरतात असं मुळीचच नाहीये. आपल्या महाराष्ट्रात बघ, अनेक लोकं हॉस्पिटलमधून बरे होऊन घरी परत आले आहेत. कोरोनाची लक्षणं दिसणा-या अनेकांच्या चाचण्यांचेरिपोर्ट्स निगेटिव्ह आहेत. म्हणजे त्यांना लागण झालेली नाही. तुला भीती वाटणं अगदीच स्वाभाविक आहे. पण आपण योग्य ती काळजी घेतली तर या व्हायरसला हरवू शकतो. त्यामुळे तू अजिबात घाबरू नकोस. फक्त या दहा काही गोष्टी लक्षात ठेव. स्वत: तर करच; पण तुझ्या घरातल्या सगळ्यांना करायला सांग.

1) आईबाबा कुणी गरजेचं सामान आणायला बाहेर गेले तर त्यांना दुकानात सुरक्षित अंतर राखून रांगेत उभं राहायला सांग.2) आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी एकावेळी घरातली एकच व्यक्ती बाहेर पडायला हवी. आईबाबा, किंवा घरातल्या दोन मोठय़ांनी एकाच वेळी जायचं नाही.3) घराबाहेर पडताना मास्क घातला आहे ना चेक कर.

4) कुणालाही पैसे देताना लांबून द्यायचे.5) घराबाहेर असताना अनावश्यक वस्तूंना हात लावणं टाळलं पाहिजे.6) घराबाहेर तोंडाजवळ अजिबात हात न्यायचा नाही. स्पर्श करायचा नाही.7) पोलीस दादांनी अडवलं तर त्यांना घराबाहेर पडण्याचं कारण स्पष्टपणे सांगायचं.8) खरेदीसाठी एक वेगळी पिशवी आईबाबांना करायला सांग.9) बाहेरून आल्यावर साबणाने हातपाय स्वच्छ धुतले पाहिजेत.10) कुठलीही लक्षण दिसली तर लगेच डॉक्टरांना संपर्क करायला हवा.या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण मिळून केल्या तर आपण या व्हायरसला पळवून लावू शकतो. मग आता होणार ना शूर. भीती काढून टाक आणि लढायला सज्ज हो.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या