शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

त्यांना  थँक्स  म्हंटलं  का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 07:40 IST

थँक यू ... तरी आपल्यासाठी काम करत असलेल्या लोकांना किती बरं वाटतं!

ठळक मुद्दे तुम्ही करत असलेल्या कामाची आम्हाला जाणीव आहे. हे सांगणंही फार महत्वाचं असतं!

तुम्ही ग्रीटिंग कार्डस बनवली असतील ना? शाळेत हस्तकलेच्या तासाला? किंवा कुठल्यातरी मित्रमैत्रिणींच्या वाढदिवसाला? किंवा आईवडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाला? किंवा शिक्षक दिनाला? तुम्ही मस्त कार्डशीट आणलं असेल, त्यावर काहीतरी छान चित्र कापून चिकटवलं असेल, त्याला लेस किंवा बो लावला असेल, त्यावर मस्त चित्र काढलं असेल आणि मग स्वत: तयार केलेलं ते कार्ड तुम्ही तुमच्या लाडक्या माणसाला दिलं असेल. त्यावेळी त्यांना किती आनंद झाला असेल. कारण कोणीतरी आपली आठवण ठेऊन आपल्याला असं कार्ड देतंय ही भावनाच फार छान असते. त्यामुळे आपल्यासाठी काहीतरी करणा?्या माणसाला अजून चांगलं काम करण्याचा हुरूप येतो. मग असं कार्ड आपल्यासाठी काम करणा?्या इतर लोकांनाही आपण देऊ शकतो का?अशी खूप माणसं असतात, ज्यांच्या कामामुळे आपलं आयुष्य सोपं होत असतं. उदाहरणार्थ सफाई कर्मचारी. या सगळ्या कोव्हिडच्या संकटात सुद्धा आपलं गाव, शहर, रस्ते स्वच्छ दिसतात कारण आपल्या शहरातले स्वच्छता कर्मचारी त्यांचं काम करत असतात. रोज सकाळी ते ठरलेल्या वेळी घंटागाडी घेऊन येतात. रोज आपल्या घरातला कचरा घेऊन जातात. पण त्यांना कोणी थँक यू म्हणत नाही.आपलं आरोग्य सांभाळण्याच्या कामी डॉक्टर जितका महत्वाचा असतो तितकाच सफाई कर्मचारी महत्वाचा असतो. डॉक्टर आपल्याला आजारी पडल्यावर बरं करतो, तर सफाई कर्मचारी स्वच्छता ठेऊन आपण आजारी पडूच नये याची सोय करत असतो. मग आपल्यासाठी इतकं काम करणा?्या लोकांना निदान एक छोटं थँक यू कार्ड तरी आपण द्यायला पाहिजे ना?

मग काढा तुमचं हस्तकलेचं साहित्य बाहेर! कार्डशीट, रंग, पेन, पेन्सिली, स्केच पेन्स आणि तुम्हाला वाटणारी कृतज्ञता मस्त कार्ड बनवून पोचवा त्यांच्यापयर्ंत. त्यांना सांगा, की तुम्ही करत असलेल्या कामाची आम्हाला जाणीव आहे. हे सांगणंही फार महत्वाचं असतं!