शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : चीनमधली मुलं दोन महिने झाले घरात आहेत, त्यांचा वेळ कसा जातो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 15:23 IST

गेल्या दोन महिन्यांपासून चीनमधील लहान-मोठी सर्व मुलं आपल्या आई-बाबांबरोबर घरात कडीबंद आहेत. काय बरं करत असतील ते घरात बसून?

ठळक मुद्देमुलांना कंटाळा आला नसेल का? - हे पाहा त्यांनी काय काय केलं ते :

आपल्याकडे कोरोनामुळे शाळा बंद होऊन मुलं घरात बसली ती अगदी आत्ता आठवडय़ाभरापूर्वी! पण कोरोनाचा पहिला संसर्ग झाला चीनमध्ये. त्यामुळे त्या देशात गेल्या दोन महिन्यांपासून शाळेला सुट्टी आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून चीनमधील लहान-मोठी सर्व मुलं आपल्या आई-बाबांबरोबर घरात कडीबंद आहेत. काय बरं करत असतील ते घरात बसून? मुलांना कंटाळा आला नसेल का? - हे पाहा त्यांनी काय काय केलं ते 

1.  चीनमध्ये शिस्त फार.  त्यामुळे शाळा  बंद असली तरी अभ्यास बंद  नको म्हणून तिथल्या शाळांनी ई-लर्निग सुरू केलं. त्यामुळे दिवसाचा बराचसा वेळ मुलांचा ऑनलाइन शिकण्यातच जातो आहे.

2. मुलांची ऑनलाइन शाळा, तसं आई-बाबांचं पण ऑनलाइन ऑफिस सुरूच आहे; त्यामुळे सगळेच सध्या घरात आहेत!

3. आळस करायचाही कंटाळा आल्यावर अनेक घरांनी उठण्यापासून झोपण्यार्पयतचं एक वेळापत्रक बनवलं. अभ्यासाच्या वेळी अभ्यास, खेळायच्या वेळी खेळ असं ठरलं.

4. अभ्यासानंतर मुलं आनंदानं पुस्तकं वाचू लागली. चित्रं काढू लागली. हस्तकलेच्या वस्तू  बनवू लागली.

5.  चीनमधली अनेक  मुलं सध्या मोङॉक आर्ट, सिरॅमिक पेण्टिंग शिकत आहेत.

6. घरात सगळे मिळून मोनोपोली, पत्ते, उनोसारखे बैठे खेळ खेळत आहेत.

7. अनेक मुलं आपल्या आईसोबत स्वयंपाक करीत आहेत. नवीन पदार्थ शिकत आहेत. 

8. सध्या चीनमध्ये वसंत ¬तू सुरू आहे. त्यामुळे मुलं आई-बाबांच्या मदतीनं घरातल्या अंगणात भाजी आणि फुलांची शेती करण्याचा प्रयोग करीत आहेत.

9.  पालकांनी आपल्या मुलांच्या मित्र-मैत्रिणींचे सोशल मीडियावर ग्रुप केले आहेत. मुलं घरात करीत असलेली अॅक्टिव्हिटी, नाटक, गाणं, डान्स हे शूट करून ते ग्रुपवर टाकत आहेत.  टिकटॉक व्हिडीओ बनवित आहेत.

1क्. व्यायामाचे अॅप्स फोनवर डाउनलोड करून आई-बाबा आणि मुलं एकत्र व्यायाम करीत आहेत.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या