ही गोष्ट आहे ब्रॅण्डन आणि कॅमरॉन या भावा बहिणीची. ही भावंडं अमेरिकेतील मिनेसोटा येथे राहतात. कॅमरॉन ही सहा वर्षाची तर ब्रॅण्डन हा सात वर्षाचा. ब्रॅण्डन घाबरट आहे. त्याला कुठल्याही गोष्टीची लगेच भिती वाटायला लागते.कोरोना व्हायरस जसा पसरायला लागला तशा त्याविषयीच्या बातम्याही येऊ लागल्या. घरात जेव्हा टीव्हीवर बातम्या चालू असायच्या तेव्हा ब्रॅण्डनही तिथेच असायचा. कोरोना व्हायरसच्या बातम्या ऐकून ब्रॅण्डन घाबरायला लागला. आपला भाऊ कोरोनाची बातमी बघून घाबरतो हे छोट्याशा कॅमरॉनच्या लक्षात आलं. ती लगेच उठून ब्रॅण्डनच्या जवळ गेली. त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्याच्या हातावर आपला हात घासला . त्याच्याशी ती काहीतरी बोलली. आणि त्याला मिठीही मारली. आपल्या बहिणीच्या अशा वागण्यानंब्रॅण्डनशांत झाला. पुन्हा हसू खेळू लागला. त्यांची आई हे सर्व बघत होती. तिला उत्सुकता होती की कॅमरॉन आपल्या भावाशी नेमकं काय बोलली. परत दुस:या दिवशी करोनाची बातमी पाहून ब्रॅण्डन घाबरला. कॅमरॉन परत आपल्या भावाजवळ गेली. हे बघून त्यांच्या आईनं मोबाइलचा कॅमेरा ऑन केला. आणि तिनं त्याचं शुटींग केलं. कॅमरॉन आपल्या भावाचा हात हातात घेऊन त्याला बायबल मधलं एक वचन म्हणून दाखवते. ती म्हणते की, ‘ घाबरू नकोस. आपल्या स्वत:वर विश्वास ठेव. काहीही होणार नाही. आपण फक्त काळजी घ्यायची. आणि छान जगायचं’असं आपल्या भावाला सांगून कॅमरॉन त्याला मिठी मारते.
ब्रॅंडनला वाटली तशी तुम्हालाही कोरोनाची भीती वाटते का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 10:09 IST
ब्रॅण्डन आहे, तसे तुम्ही आहात का?
ब्रॅंडनला वाटली तशी तुम्हालाही कोरोनाची भीती वाटते का ?
ठळक मुद्दे व्यवस्थित काळजी घेतली तर घाबरायचं कशाला ?