आता काय करू?’ हाच प्रश्न अबूधाबीत राहणा:या पॉपी शेरवूड नावाच्या मुलीलाही पडला होता. या प्रश्नावर तिच्या आईनं तिला सुचवलेल्या ‘आयडिया’मुळे पॉपी सध्या खूपच खूष आहे. आशा शेरवूड ही पॉपीची आई. गेल्या दोन आठवड्यांपासून अबूधाबीमध्येही लॉक डाऊन सुरू आहे. पॉपीला खूप कंटाळा आल्यावर तिच्या आईनं तिला पत्र लिहिण्याची कल्पना सूचवली. पॉपीची आई ‘अबू धाबी रिव्ह्यू’ची संस्थापिका. तिनं आपल्या मित्रच्या मुलीशी पॉपीची फोनवर गाठ घालून दिली. या दोघींनी एकमेकींना पत्र लिहायचं ठरवलं. सुरूवातीला दोघीच एकमेकींना पत्र लिहू लागल्या. पण आता त्यांच्या सोबतीनं अनेक मुलं मुली पत्र लिहित आहेत. कारण पॉपीच्या आईनं ‘पेन पाल’ म्हणजे पेन मित्र नावाचा एक ग्रूपच तयार केला आहे.
coronavirus : पॉपीने कुणाला लिहिली प्रेमळ पत्रं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 21:47 IST
जगभरातली ‘घर-बंद’ मुलं सध्या काय करताहेत?
coronavirus : पॉपीने कुणाला लिहिली प्रेमळ पत्रं?
ठळक मुद्देपत्र लिहिण्यात पॉपीचा आता बराच वेळ जाऊ लागला आहे