शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : एवढुशी  तैतून , पण  कोरोना लढाईत ती पण उतरली आहे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 17:26 IST

तैतूम म्हणते, घाबरू नका!

ठळक मुद्देजेव्हा आपल्याला भिती वाटेल तेव्हा आपणही दीर्घ श्वास घेऊन बघू या!

तैतूम बाऊमन ही पाच वर्षाची छोटीशी मुलगी. सध्या यू ट्यूबवरील तिच्या व्हिडीओला खूप लाइक्स मिळत आहेत. असं त्या व्हिडीओत आहे तरी काय?तर त्या व्हिडीओमध्ये इवलीशी तैतूम कोरोना व्हायरसशी कसं लढायचं हे सांगते. ती म्हणते,  ‘मला माहिती आहे तुम्ही सर्व खूप घाबरलेले आहात. पण ओके. शांत राहा! नाक पुसण्यासाठी टिश्यु पेपरचा वापर करा. पौष्टिक अन्न खा. पण घाबरू नका. शांत राहा! तुम्हाला जर खूप भिती वाटली तर दीर्घ श्वास घ्या. पण असं करताना आपल्या आजी आजोबांपासून लांब राहा नाहीतर आजी आजोबा आजारी पडतील’   एवढ्याशा तैतूमला एवढं कसं माहिती? तिला मोठ्यांनी शिकवलं असेल का बोलायला?

-तर नाही मोठ्यांनी तिला असं बोलायला सांगितलं नाही. पण मोठ्यांच ऐकून पाच वर्षाच्या तैतूमला कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती खूप गंभीर झाल्याचं मात्र लक्षात आलं. तैतूमची आई रॅशेल एलीस ही सतत तैतूम सोबत गप्पा मारत असते.  तैतूमला तिच्या आईनं शाळेत का जायचं नाही? घरीच का बसून राहायचं? पार्कमध्ये खेळायला का जायचं नाही? हे सर्व नीट समजावून सांगितलं. तैतूमला आई जे सांगत होती ते कळत होतं. मग तैतूमला वाटलं आापल्याला जे कळलं ते आपल्या मित्र मैत्रिणींनाही कळायला हवं. म्हणून तिनं तिच्या आईला व्हिडीओ करायला सांगितला. आणि तिच्या आईनं रेकॉर्डिंग सुरू केलं. तैतूमनं आपल्या आईकडून जेवढं ऐकलं ते सर्व ती सांगू लागली. तिचा व्हिडीओ तिच्या आईनं यू ट्यूबवर टाकला. त्या व्हिडीओला 18,000च्या पुढे लाइक्स मिळाले. तैतूमला तिच्या आईकडून मनानं स्ट्रॉंग होण्याचेही धडेही मिळतात. तैतूमला तिची आई नेहेमी म्हणते की,  ‘अवघड प्रसंग आला तर घाबरायला होतं. पण चिंता करायची नाही. घाबरायचं नाही. जेव्हा भिती वाटेल तेव्हा दीर्घ श्वास घ्यायचा. त्यामुळे मनातली भिती पळून जाते आणि मनात छान विचार यायला लागतात.

तैतूमनं आपल्या आईकडून जे ऐकलं ते आपल्याला सांगितलं. आता आपण तैतूमचं ऐकायचं ना? म्हणजे जेव्हा आपल्याला भिती वाटेल तेव्हा आपणही दीर्घ श्वास घेऊन बघू या!