शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

आता शाळा ऑनलाईन होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 07:10 IST

पण हे कसं शक्य आहे? शाळेत जायचंच नाही म्हणजे काय?

ठळक मुद्देशाळा जर इतक्यात सुरु होणार नसतील तर काही ना काही पर्याय तर शोधावेच लागतील.

मी असं वाचलं की आता शाळा ऑनलाईनच होणार बहुतेक. असं कसं शक्य आहे?  - मधुरा सैंदाणे , औणोरंगाबाद

मधुरा, सध्या आपण तिसऱ्या  लॉक डाऊन फेजमध्ये आहोत. 17 मे ला हा तिसरा टप्पा संपेल, पण त्यांनंतरही आपलं रुटीन सुरु होईल की नाही आता सांगता येत नाही. शाळा 15 जूनला सुरु होतात पण यंदा त्या कधी सुरु होतील काहीच सांगता येणार नाही. तुम्हा मुलांचे रिझटल्सही यंदा ऑनलाईनच समजणार आहेत. अशात शाळाही कदाचित ऑनलाईन सुरु होऊ शकते. परदेशात जिथे जिथे शाळा या कालावधीत सुरु होतात त्या ऑनलाईन सुरु झालेल्या आहेत. काही ठिकाणी तर सगळं शाळेत करतात तसंच करायचं फक्त घरात अशी पद्धत सुरू झालेली आहे. म्हणजे शाळा भरायच्या वेळी गणवेश घालून आपापल्या मोबाईल किंवा कम्युटरसमोर बसायचं. प्रत्येक तासाला जो तो शिक्षक ऑनलाईन येऊन शिकवतो. मधली सुट्टीची वेळ झाली की जेवण करायचं आणि दिलेल्या वेळात परत ऑनलाईन यायचं. नेहमी ज्या वेळेला शाळा सुटते तशीच सुटणार अशा पद्धतीने परदेशात ऑनलाईन शाळा सुरु केलेल्या आहेत. पण आपली परिस्थिती जरा वेगळी आहे. सगळ्यांच्या घरात कम्प्युटर आणि वायफायच्या सुविधा नाहीत. आपल्या मनपा आणि झेडपीच्या शाळेत शिकणा ऱ्या  मुलांकडे अनेक तांत्रिक सुविधा नाहीत. अशावेळी ते ऑनलाईन शाळेत सहभागी होऊ शकतीलच असं नाही. त्यामुळे ऑनलाईन शाळा कशा सुरु करता येतील हा मोठा प्रश्नच आहे. कदाचित त्यासाठी व्हॉट्स ?पचा वापर आपल्याकडे होऊ शकतो. म्हणजे ज्या त्या विषयाच्या शिक्षकाने ज्या त्या धड्याचे व्हिडीओज बनवायचे आणि whats app ग्रुप वर टाकायचे. आणि इतर नोट्सच्या फाईल्स ही whats app वर द्यायच्या असा एक मार्ग आपल्याकडे काढता येऊ शकेल. कारण व्हॉट्स अप बहुतेक सगळ्यांकडे असतं. शिकवण्या ऑनलाईन झाल्यावर पेपरही ऑनलाईन घ्यावे लागतील, ते कसं करता येईल याबाबतही विचार सुरु आहेतच. 

परदेशात जितक्या सोप्या पद्धतीने ऑनलाईन शाळा घेतल्या जाऊ शकतात तितक्या आपल्याकडे शक्य नाही. कारण आपल्या देशात गरीब विद्याथ्र्यांची संख्या मोठी आहे. पण शाळा जर इतक्यात सुरु होणार नसतील तर काही ना काही पर्याय तर शोधावेच लागतील. ते काय असतील हे लवकरच समजेल आपल्याला.