शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सतत तुमची चिडचिड होत असेल, तर हे घ्या त्यावरचं उत्तर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 13:03 IST

.. तरी बरं!

ठळक मुद्देपरिस्थिती तर आपण बदलू शकत नाही, पण निदान आपला वैताग तरी कमी करू शकतो का? 

तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की काहीच तुमच्या मनासारखं होत नाही? म्हणजे तुम्ही खूप अभ्यास केला होता, पण नेमकं परीक्षेच्या वेळी बरं नव्हतं म्हणून चांगले मार्क्‍स मिळाले नाहीत.. किंवा तुम्ही खरंच गृहपाठ केला होता, पण तुम्ही खरंच वही घरी विसरलात आणि मग शिक्षकांनी तुम्हाला शिक्षा केली.. किंवा तुम्ही लग्नाला जाण्यासाठी तुमच्या सगळ्यात आवडत्या नवीन ड्रेसला इस्त्री करायला घेतलीत आणि तेवढ्यात कोणीतरी हाक मारली आणि त्या गडबडीत नेमकं त्याचं वरचं नेट जळलं आणि आता तो घागरा तुम्ही घालू शकत नाही..जाऊदे. अशा अनेक गोष्टी आपल्या बाबतीत सारख्या घडत असतात आणि त्यामुळे आपली त्या त्या वेळी भयंकर चिडचिड पण झालेली असते. आणि सारखं सारखं असं व्हायला लागलं की आपल्याला वाटतं, की अश्या सगळ्या गोष्टी फक्त माङयाच बाबतीत होतात. इतर सगळ्यांचं सगळं छान होतं. मलाच फक्त हवं तसं काही होत नाही. आणि मग आपणही प्रत्येक गोष्टीवरून चिडचिड करायला लागतो. पण आपल्याला जरी असं वाटत असलं तरी ते काही खरं नसतं. म्हणजे सगळ्या वाईट गोष्टी फक्त आपल्याच बाबतीत घडतात हेही खरं नसतं आणि आपल्या बाबतीत सगळं वाईटच घडतं हेही खरं नसतं. पण ज्यावेळी काहीतरी असं मनाविरुद्ध घडतं तेव्हा ते हँडल कसं करायचं ते आपल्याला कळत नाही हा खरा प्रॉब्लेम असतो. आणि त्यावरचं उत्तर आहे, तरी बरं!प्रत्येक वेळी असं काही तरी झालं की त्याहून काय वाईट घडलं असतं त्याचा विचार करायचा आणि स्वत:ला सांगायचं की,  ‘तरी बरं, इतकं वाईट काही घडलं नाही!’म्हणजे सगळ्यात आवडता नवीन घागरा खराब झाला, तरी बरं, दुसरा एखादा ड्रेस घालायला होता. एकच ड्रेस असता तर मी लग्नात काय घातलं असतं? असा विचार करायचा, म्हणजे आपल्याला कमी त्रस होतो.परिस्थिती तर आपण बदलू शकत नाही, पण निदान आपला वैताग तरी कमी करू शकतो का?