शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुबगुबीत सशासारख्या उडय़ा मारून पाहा; म्हणजे कळेल काय ते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 13:11 IST

बनी हॉप्स.

ठळक मुद्देआज आपण हाच व्यायाम करू. याला म्हणायचं ‘बनी हॉप्स’ म्हणजे सशाच्या उडय़ा.

मला ससा फार आवडतो. कसा मस्त पांढराशुभ्र आणि गुबगुबीत! अर्थात ससे काही फक्त पांढऱ्या  रंगाचेच असतात, असं नाही, पण आपण बऱ्याचदा पाहतो, तो ससा पांढऱ्या  रंगाचाच असतो.सशांना चालताना तुम्ही कधी पाहिलं आहे?- त्याचं चालणं म्हणजे उडय़ा मारणंच असतं. ससा म्हणजे मुलुखाचा भित्र. लहानपणी तुम्ही सशाची ती गोष्ट ऐकलीच असेल. पण सशाच्या खऱ्या  गोष्टीही ऐकायला तुम्हाला फार आवडेल.तुम्हाला माहीत आहे, ससा एवढा चपळ का आहे? आणि अगदी बारीकशीही चाहूल त्याला कशी काय लागते?- कारण सशाला जवळपास चारही बाजूंचं दिसतं. त्यामुळे त्याला पकडणंही फार अवघड असतं. एकाचवेळी सगळीकडचं त्याला दिसत असलं तरी अगदी नाकासमोरचं मात्र त्याला दिसत नाही. सशाचे कान आणि नाकही अगदी तीक्ष्ण असतात. वासावरुनही अनेक गोष्टी तो सहज ओळखतो. त्याच्या मिशा त्याच्या शरीराच्या रुंदीएवढय़ा असतात. का माहीत आहे? - समजा एखादं बीळ दिसलं, तर त्या बिळात आपण जाऊ शकू की नाही, हे त्याला आपल्या मिशांवरुन कळतं. आपल्या गोष्टीतल्याप्रमाणोच ससा तसा झोपाळू प्राणी आहे. दिवसातून किमान आठ ते दहा वेळा तो मस्तपैकी ताणून देतो.ससा भित्री भागूबाई असला, तरी तो पळतो मात्र दणक्यात. त्याच्या या पायांमुळेच त्याला आपल्या शत्रूपासून संरक्षण करणं शक्य होतं. सशाच्या रंगरुपाकडे जाऊ नका, त्याच्यासारख्या उडय़ा मारून पाहा, नाही नानी आठवली तर माझं नाव दुसरं! आज आपण हाच व्यायाम करू. याला म्हणायचं ‘बनी हॉप्स’ म्हणजे सशाच्या उडय़ा.कसा कराल हा व्यायाम?1- गुडघ्यात वाकून उभे राहा. फार जास्तही नाही आणि फार कमीही नाही.2- पाठ ताठ ठेवा.3- दोन्ही हात कोपरात वाकवून ससा उभा राहतो तसं उभे राहा.4- याच स्थितीत आता मारा उडय़ा.5- हा व्यायाम आणखी चॅलेंजिंग करायचा असेल, तर जास्त लांब उडी मारा. 6- आपल्याला जमेल तेवढय़ाच उडय़ा मारा, पण सुरुवातीला जास्त बिलकूल नकोयामुळे काय होईल?1- पायांची, मांडय़ांची ताकद वाढवण्यासाठी हा टेरिफिक व्यायाम आहे.2- लोअर बॉडीसाठीही हा एकदम हटके  व्यायाम आहे. 3- तुमच्या शरीराची मोबिलीटीही त्यामुळे वाढेल.माराल मग या सशाच्या उडय़ा?बघा मारून आणि सांगा मला काय झालं ते?  चालता, बसता आलं का ते? - तुमचीच ‘सस्सूबाई’, ऊर्जा