शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Kill कंटाळा :- ताईच्या जीन्सचे पाय कापा! की झाली तुमची शॉर्ट्स तय्यार :-)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 18:05 IST

कोणाच्या तरी कपडय़ांमध्ये एखादी जुनी जीन्स नक्की सापडेल. ती स्वच्छ धुवा. वाळवा. तिला इस्री करा. आता आपला कच्चा माल तयार आहे. या जीन्सपासून आपल्याला काय काय करता येईल ते बघा.

ठळक मुद्दे सगळ्यात महत्त्वाचं.. आई आणि बाबाची जीन्स घेण्यापूर्वी सावधान!

- गौरी पटवर्धन

रोज सकाळी उठलं की तुमचा पहिला प्रश्न,  ‘आज मी काय करू?’. त्यावर आईचं उत्तर,  ‘सकाळी सकाळी कटकट करू नकोस. तुमची शाळा सुरू होती तेच बरं होतं. तुझं तू बघ!’- या सगळ्यापासून सुटका पाहिजे असेल तर तुमच्या जुन्या झालेल्या कपडय़ांचं गाठोडं उघडा. त्यात एखादी तरी जुनी जीन्स असेलच. तुमच्या जुन्या कपडय़ांमध्ये नसेल तर ताईच्या/ दादाच्या/ काकाच्या/ मावशीच्या/ आत्याच्या कोणाच्या तरी कपडय़ांमध्ये एखादी जुनी जीन्स नक्की सापडेल. ती स्वच्छ धुवा. वाळवा. तिला इस्री करा. आता आपला कच्चा माल तयार आहे. या जीन्सपासून आपल्याला काय काय करता येईल ते बघा.

1. जीन्स आपल्या मापाची असेल तर तिची शॉर्ट्स करता येईल. आपल्याला पाहिजे तेवढं माप घेऊन जीन्स कापायची. आणि मग आईने कितीही सांगितलं तरी त्याला खालून टीप घालायची नाही. खालचे काही दोरे काढायचे आणि मग खालच्या दशा चक्क विंचरायच्या. जीन्सची शॉर्ट्स तयार!

2. जीन्सचे दोन्ही पाय जिथे वेगळे होतात तिथे जीन्स कापायची. खालून शिवण मारायची. वरून एक चेन किंवा वेल्क्रो किंवा बटणं लावायची. खालच्या पायांच्या पट्टय़ा बनवून त्याचा बेल्ट करायचा. जीन्सची बॅग तयार! जीन्सचे सगळे खिसे त्या बॅगेचे कप्पे म्हणून वापरता येतात.

3. मुलींसाठी जुन्या जीन्सचे पाय उसवायचे. ते समोरच्या आणि मागच्या बाजूला शिवायचे. आणि मग आपल्याला पाहिजे तेवढय़ा उंचीवर स्कर्ट कापायचा. त्याला मात्र खालून शिवण घालायची.

4. अगदी फाटलेली जीन्स असेल तर तिच्या फक्त दोन हिप पॉकेट्सचं वॉल हँगिंग बनवायचं.

सगळ्यात महत्त्वाचं.. आई आणि बाबाची जीन्स घेण्यापूर्वी सावधान! चुकीची जीन्स फाडलीत तर सुट्टीतले सगळे उद्योग बंद होण्याचा धोका आहे.