शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

स्वत:ला दोन पायावर ओढत नेणारी मगरीची चाल कशी चालाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 16:17 IST

अॅलिगेटर ड्रॅग.

ठळक मुद्देकराल मग हा व्यायाम?

तुम्ही सुसर, मगर पाहिली आहे? दोन्ही एकाच कुळातल्या. मागे एकदा मी एक मगर पाहिली होती. खाडीजवळ. काठावर. पाण्यात एकदम स्वस्थ बसलेली. एवढीश्शीही हालचाल नाही. पाण्यात जणू काही एखादा दगड पडला आहे! काही वेळानं हरणांचा एक कळप तिथे दबकत दबकत आला. ते तर किती भित्रे भागुबाई असतात, तुम्हाला माहीत आहे. त्यांना पाणी प्यायचं होतं. काही वेळ ते घुटमळले. चारही दिशांचा अंदाज घेतला. काहीच धोका नाही, हे कळल्यावर त्यातल्या एका हरणानं हळूच पाण्यात तोंड घातलं. तरीही त्याची नजर इकडे-तिकडे घुटमळतच होती. तेवढय़ात. अचानक पाणी हललं. विजेच्या वेगानं एक मगर झप्पकन बाहेर आली आणि तिनं हरणाला आपल्या जबडय़ात पकडलं आणि ओढत पाण्यात नेलं.पण पुढे मी पाहू शकले नाही. 

यूटय़ूबवरचा व्हीडीओ होता तो!पण मगर किती डेंजर प्राणी आहे, हे आपल्याला माहीत आहे. आपल्या टप्प्यात आलेल्या अशा मोठय़ा प्राण्यांची आणि गुरांचीही शिकार मगर करू शकते. मगर पाण्यात राहात असली, तरी ब:याचदा ती  किना:यावर तोंडाचा आ करून ऊन खात पडलेली आपल्याला दिसून येईल. तिला चालताना तुम्ही कधी पाहिलंय?जरुर पाहा. नाहीतर मी सांगते तसं करा. एकदम मगरीसारखं चालल्याचा भास तुम्हाला होईल. या व्यायामाला म्हणायचं ‘अॅलिगेटर ड्रॅग’. ड्रॅग म्हणजे ओढणो. तिच्यासारखंच आपल्याला आपलं संपूर्ण शरीर पुढच्या फक्त दोन ‘पायांनी’; म्हणजे हातांनी ओढत न्यायचं आहे. कसा कराल हा व्यायाम?1- पुश अप्स, जोर काढण्यासाठी जशी पोङिाशन घेतो तशी, पोङिाशन घ्या, म्हणजे जमिनीवर दोन्ही हातांचे तळवे टेकवा. 2- पाय मागे सोडलेले. जणू पायांत काही त्रणच नाही. 3- नजर समोर. शरीराचा सगळा भार फक्त हातांवर.4- पायांचा कुठलाही वापर न करता, फक्त हातांवर पुढे पुढे चाला. पाय मागून सरपटत आले पाहिजेत. 5- पाय जर ओढले जात नसतील, तर एक आयडिया करा. पायांखाली एखादी प्लेट किंवा टॉवेल ठेवा. त्यामुळे पाय ओढायला मदत होईल.यामुळे काय होईल?1- पोटाचा डेंजर व्यायाम होईल.2- एखाद्याला एक ठेवली, तर ‘पाणी’ मागेल, इतके हात फौलादी होतील. 3- कार्डिओ एक्सरसाइज होईल.4- स्टॅबिलिटी वाढेल.कराल मग हा व्यायाम? पण हा व्यायाम करून पंगा मात्र घेऊ नका. मला तिच्या आणखीही ब:याच ट्रिक माहीत आहेत.- तुमचीच ‘मगरमच्छ’, ऊर्जा