शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासाला जायचं आणि आजारी पडून यायचं.. कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 12:52 IST

प्रवासादरम्यान ही काळजी घ्या आणि ठेवा स्वत:ला फिट!

ठळक मुद्देप्रवासादरम्यान जितकं जास्तीत जास्त अ‍ॅक्टिव्ह राहाता येईल तितकं चांगलं. प्रवास संपल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी हलका व्यायाम अवश्य केला पाहिजे. उन्हाच्या तडाख्यानं आणि सातत्यानं पावसात भिजल्यानं आजारी पडण्याचा धोका खूप जास्त असतो. त्याचा अगोदरच बंदोबस्त करा.प्रवासाच्या आधी आपल्या डॉक्टरांकडून आवश्यक ते व्हॅक्सिनेशन करून घेणं अत्यंत गरजेचं.प्रवासाच्या आधी आपल्या डॉक्टरांकडून आवश्यक ते व्हॅक्सिनेशन करून घेणं अत्यंत गरजेचं.

- मयूर पठाडेप्रवासाला जायचं म्हणजे त्यासाठी अगदी देशाबाहेर किंवा खूप लांबच गेलं पाहिजे असं नाही. बºयाचदा आपल्या कामासाठीही अनेकदा आपला प्रवास होत असतो. काही जण तर नोकरीनिमित्तानं रोज अपडाऊन करीत असतात.प्रवास कुठलाही असो, काही गोष्टींची नियमित काळजी घेतली गेली पाहिजे, नाहीतर आपल्याआरोग्यासाठी ते महागात पडू शकतं. कारण प्रवासादरम्यान इन्फेक्शन होण्याचं आणि आजारी पडण्याचं प्रमाण खूप मोठं असतं.प्रवासात काय काळजी घ्याल?१- प्रवासात आपल्या खाण्याकडे नेहमीच व्यवस्थित लक्ष द्या, कारण दुषित अन्नपदार्थांमुळे आपल्या आरोग्याची वाट लागण्याची शक्यता सर्वात जास्त असते. पोटदुखी, डायरिया, गॅसेस.. यासारखे आजार नेहमीच प्रवासाची देण असते.२- प्रवासाच्या दरम्यान एक काळजी आवर्जुन घेता येईल, ती म्हणजे सातत्यानं आपले हात स्वच्छ धुणं. इन्फेक्शनची शक्यता त्यामुळे बरीच कमी होते.३- प्रवासाच आपलं घरचं स्वच्छ पाणी कायम आपल्या बरोबर असावं. किमान घरातून निघताना तरी जेवढं पाणी आपल्याला आपल्यासोबत कॅरी करणं शक्य आहे, तेवढं नक्कीच घ्यावं. नंतर मिनरल वॉटर बोटल्सचा वापर करता येईल, पण कुठल्याही परिस्थितीत हॉटेल किंवा इतर ठिकाणंच पाणी पिण्याचा मोह टाळावा. पैसे जातील, पण आरोग्यासाठी शेवटी तेच उपयुक्त ठरेल.४- प्रवासादरम्यान आपण नेहमी आळसावलेले असतो. प्रवासानं अंगदेखील आंबलेलं असतं. अशावेळी जितकं जास्तीत जास्त अ‍ॅक्टिव्ह राहाता येईल तितकं चांगलं. प्रवास संपल्यानंतर जिथे कुठे आपला मुक्काम असेल, त्या ठिकाणी किमान हलका व्यायामही अवश्य केला पाहिजे.५- प्रवासात उन्हाची आणि पावसाची काळजी घेतलीच पाहिजे. उन्हाच्या तडाख्यानं आणि सातत्यानं पावसात भिजल्यानं आजारी पडण्याचा धोका खूप जास्त असतो.६- आपला प्रवास जर मोठा असेल, विशेषत: परदेशात जायचं असेल तेव्हा तर आपल्या डॉक्टरांकडून आवश्यक ते व्हॅक्सिनेशन करून घेणं अत्यंत गरजेचं आहे.