शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

‘लझानिया’ एकदा खाऊन तर बघा !

By admin | Updated: April 12, 2017 13:04 IST

पिझ्झा आणि पास्ता हे कोणाला आवडत नाही. पण हे आणि एवढंच म्हणजे इटालियन फूड नाही. नुकताच लझानिया नावाचा इटालियन पदार्थ खाल्ला. पिझ्झा पास्ताप्रमाणे तोही खाणाऱ्याला वेड लावतो.

- भक्ती सोमणमुलांच्या बाबतीत पालकांची नेहमी तक्रार असते. ती म्हणजे मुलं भाजी खात नाहीत. त्यामुळे आई मुलांनी भाज्या खाव्यात म्हणून निरनिराळ्या युक्त्या शोधून काढत असते. मग त्यात भाज्यांचे पराठे, कटलेट, घावन असे काय काय प्रकार आई करत असते. आता तर मुलांसाठी भाजी चवदार करण्याचा नवीन फंडा म्हणजे त्यात चीज घालायचं. सध्या असा चीजचा भरपूर वापर इटालियन पदार्थात होतो आहे. त्यामुळे पिझ्झा, पास्ता हे प्रकार मुलांना आवडतात.

इटालियन पदार्थांत भाज्यांचा मुबलक वापर केला जातो. त्यात ते पदार्थ चीज घालून केलेले असतात. तसेच क्रीमचाही भरपूर वापर केलेला असतो. इटालियन हर्ब्स, पार्सली, पांढरे-काळे मिरे, चिली फ्लेक्स हे घटक इटालियन पदार्थात मुख्यत्वाने वापरले जातात. याशिवाय रावियोली, पास्त्याच्या शीटपासून लझानिया, रातातुली, मोसाका, रिझोतो राईस असे अनेक प्रकार इटालियन जेवणात येतात.

नेहमीच पिझ्झा, पास्ता खाऊन कंटाळा आल्यानं यावेळी मैत्रिणीबरोबर हॉटेलमध्ये गेले, तेव्हा लझानिया खाल्ला. लझानिया ही लांब शीट असते. त्या शीटमध्ये उकडलेला पालक, मशरूम, कांदा, लसूणचे सारण पसरवून त्यावर चीज मग पुन्हा लझानिया शीट घातली जाते. असे आणखी २-३ वेळा केलं जातं. सगळयात वर चीज घालून ही डिश मायक्रोव्हेवमध्ये किमान २० मिनिटं बेक केली जाते.

ही डिश खाताना चीजमुळे मजा तर येत होतीच पण थोडी टँगीही लागत होती. वेगळ्या पद्धतीनं तयार होणाऱ्या या इटालियन पदार्थांचं म्हणूनच लोकांना विशेष आकर्षण सध्या वाटतंय. आपल्याकडे जेवण करताना ज्याप्रमाणे मोहरी, हिंग, हळद, तिखट हे प्रकार वापरावेच लागतात त्याप्रमाणे इटालियन पद्धतीत प्रत्येक पदार्थांत चीज वापरणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं.

आपण खातो त्या चीजव्यतिरिक्त ३०० चीजचे प्रकार आहेत. पण रोजच्या वापरात साधारणपणे मॉझरेला, रिकोटा, पामेझान, प्रोसेड चीजेसचा वापर प्रामुख्यानं केला जातो. त्याचबरोबरीनं प्रत्येक पदार्थात टॉमेटो सॉस म्हणजेच कॉर्नकसे घालण्यालाही इटालियन पद्धतीच्या जेवणात फार महत्त्व आहे. कॉर्नकसेचे महत्व भारतीय पदार्थात ज्याप्रमाणे ग्रॅव्हीचे असते अगदी तसंच आहे.