शहरं
Join us  
Trending Stories
1
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
2
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
3
'महाभारत'मधील कर्णाचा अस्त, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
4
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
5
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
6
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
7
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
8
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
9
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
10
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
11
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
12
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
13
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
14
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
15
सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?
16
फायद्याची गोष्ट! हात धुण्याची योग्य पद्धत माहितीय का? ९९% लोक करतात 'या' छोट्या चुका
17
क्रेडिट कार्ड बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? बंद करण्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाची गोष्टी
18
बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
19
'कौआ बिर्याणी'च्या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आठवतोय का?, एकेकाळी विकायचा साडी
20
शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट! पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? तुमचे नाव यादीत असे घरबसल्या तपासा

डेहराडूनमधल्या रामगढ गावात जा ....फिरण्यासोबतच शेतीही शिकून या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 18:39 IST

उत्तराखंडमधल्या डेहराडूनमध्ये अशी एक जागा आहे. याठिकाणी पर्यटक शेती शिकण्यासाठी येतात. आॅरगॅनिक फार्मिंग अर्थात जैविक शेतीमुळे हे ठिकाण पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत आहे. डेहराडूनमधल्या या छोट्याशा गावाचं नाव आहे रामगढ. हे रामगढ शोले फिल्ममधलं नसलं तरी आहे मात्र तितक्याच कमालीचं.

ठळक मुद्दे* दरवर्षी देशातलेच नव्हे तर अगदी जपान, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, अमेरिकेतूनही हजारो विद्यार्थी या गावाला भेट देतात.* गावात राहून जैविक शेती जवळून पाहण्याची, स्वत: शेतकºयांना त्यांच्या कामात मदत करायची संधी त्यांना मिळते. पर्यटकांना राहण्यासाठी गावात खास व्यवस्था केली जाते. संख्या जास्त असेल तर अगदी कॅम्पही लावले जातात.

 

- अमृता कदमफिरायला जाण्याचा मुख्य उद्देश हा रोजच्या धकाधकीतून बाहेर पडून निवांतपणा अनुभवण्याचाच असतो. त्यामुळे ब-याचदा पयर्टकांचा कल हा निसर्गरम्य ठिकाणी जाण्याकडेच असतो. पण निसर्गाला अनुभवण्यासोबतच त्याचा भाग होण्याची, त्यामध्ये समरसून जाण्याची संधी तुम्हाला मिळाली तर? उत्तराखंडमधल्या डेहराडूनमध्ये अशी एक जागा आहे. याठिकाणी पर्यटक शेती शिकण्यासाठी येतात. आॅरगॅनिक फार्मिंग अर्थात जैविक शेतीमुळे हे ठिकाण पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत आहे. डेहराडूनमधल्या या छोट्याशा गावाचं नाव आहे रामगढ. हे रामगढ शोले फिल्ममधलं नसलं तरी आहे मात्र तितक्याच कमालीचं.देहरादूनजवळच्या या छोट्याशा गावात काही वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की लोक गावात राहायला तयार नव्हते. रोजगाराची साधनं उपलब्ध नसल्यानं स्थलांतराचं प्रमाण वाढलं होतं. गाव अगदी सुनसान होत चाललं होतं. पण हळूहळू इथे जैविक शेतीची बीजं रोवली गेली. त्यानंतर चित्र पालटलं. आज इथे पर्यटक केवळ फिरायलाच येत नाहीत तर या जैविक शेतीतले बारकावे शिकायलाही ते येतात.

 

दरवर्षी देशातलेच नव्हे तर अगदी जपान, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, अमेरिकेतूनही हजारो विद्यार्थी या गावाला भेट देतात. या छोट्याशा गावात राहून जैविक शेती करण्याचा अनुभव त्यांना विलक्षण आनंद देतोय. इथे राहून जैविक शेती जवळून पाहण्याची, स्वत: शेतक-याना त्यांच्या कामात मदत करायची संधी त्यांना मिळते. पर्यटकांना राहण्यासाठी गावात खास व्यवस्था केली जाते. संख्या जास्त असेल तर अगदी कॅम्पही लावले जातात. मग अगदी एकत्रितपणेच सगळे भोजन बनवतात. गप्पांच्या मैफलीत रात्र जागवतात. आनंदाबरोबरच या नव्या प्रकारच्या शेतीची किती आवश्यकता आहे याबद्दल त्यांच्या मनात जागृतीही वाढतेय.डेहराडूनसारख्या निसर्गरम्य ठिकाणी वसल्यामुळे रामगढच्या आसपास फिरण्यासाठीचीही अनेक ठिकाणं आहेत. शेतीच्या कामातून थकला की या ठिकाणी जाऊन फिरून येऊ शकता. त्यामुळे निसर्गानं नटलेल्या डोंगरराजीतल्या या टुमदार गावात राहण्याचा आणि शेती शिकण्याचा हा विलक्षण अनुभव सगळ्यांसाठीच अविस्मरणीय ठरतो.

इमारतींच्या जंगलातून बाहेर पडून तुम्हीही शेतक-याचं आयुष्य एकदा तरी अनुभवायला हरकत नाही. मस्त फिरण्याचा अनुभव तर मिळेलच, पण स्वत: शेतीचा अनुभव घेतल्यानं तुम्हाला त्यातून एखादी बिझनेस आयडियाही मिळू शकते.