शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जगभरातल्या स्ट्रीट आर्टची माहिती हवी आहे मग हे वाचा! 42 शहरातल्या 140 स्ट्रीट आर्ट एकाच पुस्तकात!

By admin | Updated: May 11, 2017 18:40 IST

स्ट्रीट आर्ट प्रेमींना जगभरातल्या शहरांमधल्या स्ट्रीट आर्टची माहिती देण्यासाठी ‘लोनली प्लॅनेट’ या ट्रॅव्हल मॅगझनिनं स्ट्रीट आर्ट वर एक पुस्तकच प्रकाशित केलं आहे.

-अमृता कदम फिरायला जायचं म्हणजे केवळ मौजमजा नाही..,अनेकजण आपले छंद जोपासण्यासाठी, आपल्या अभ्यासाच्या निमित्तानेही पर्यटन करत असतात. त्यामागे त्यांचा उद्देश एखाद्या ठराविक ठिकाणावर किंवा तिथल्या वैशिष्ट्यांवरच भर देण्याचा असतो. म्हणजे काहीजण वन्यजीवांचे छायाचित्रण करण्यासाठी, काहीजण पक्षीनिरीक्षणासाठी तर कोणी ऐतिहासिक वास्तूंच्या अभ्यासाठीही आवर्जून पर्यटन करतात.दृश्य माध्यमांची आवड असलेले लोक जगभरात भरणाऱ्या विविध प्रदर्शनांना, महोत्सवांना हजेरी लावतात. दृश्य माध्यमांमधलाच एक प्रकार म्हणजे स्ट्रीट आर्ट. शहरांमधल्या रस्त्यालगतच्या मोठमोठ्या भिंतींचाच कॅनव्हास करून चित्रं काढली जातात. मान्यवर आर्टिस्टही आपल्या कुंचल्यातून या भिंतींना एक नवं रूप देतात. केवळ स्ट्रीट आर्टचा आस्वाद घेण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी जगभर फिरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. या स्ट्रीट आर्ट प्रेमींना जगभरातल्या शहरांमधल्या स्ट्रीट आर्टची माहिती देण्यासाठी ‘लोनली प्लॅनेट’ या ट्रॅव्हल मॅगझनिनं स्ट्रीट आर्ट वर एक पुस्तकच प्रकाशित केलं आहे. या पुस्तकामध्ये 42 शहरांमधल्या स्ट्रीट आर्टसाठी प्रसिद्ध असलेल्या 140 स्थळांची माहिती दिली आहे. लंडनपासून मेलबर्न, मॉन्ट्रियाल, सॅन फ्रॅन्सिस्कोपर्यंतची शहर या यादीत सामील आहेत.

                       

हे पुस्तक केवळ ठिकाणांची यादी देऊन थांबत नाही, तर यामध्ये काही प्रमुख कलाकारांचा परिचय, स्ट्रीट आर्टशी संबंधित महोत्सव, त्या महोत्सवांची ठिकाणं यांचाही समावेश पुस्तकामध्ये केलेला आहे. स्वत: क्युरेटर आणि प्रदर्शनं आणि शो आयोजित करणाऱ्या ‘द फ्युचर टेन्स’चे संस्थापक असलेल्या एड बार्टलेट यांनी ‘स्ट्रीट आर्ट’ चे संपादन केलं आहे. त्यांच्या मते हे पुस्तक स्ट्रीट आर्टचा अनुभव घेण्याच्या तुमच्या प्रवासात स्टार्टिंग पॉइंटचं काम करतं. त्यातून तुम्हाला महत्त्वाची शहरं, त्या शहरांमध्ये स्ट्रीट आर्टमध्ये नेमकं पाहण्यासाठी काय आहे, काही प्रमुख चित्रकारांनी केलेल्या कामाचा समावेश आहे. त्यामुळे एकदम नेमकेपणाने ट्रीपचं प्लॅनिंग करता येऊ शकतं.

                     

लंडनमधल्या शहरी आयुष्याचा अनुभव स्ट्रीट आर्टच्या चष्म्यातून घ्यायचा असेल, तर नेमकी लंडनमधल्या कुठल्या गल्ल्यांमधून सुरु वात करावी, लॉस एंजलिस मधला बेल्जियन कलाकार फडअचा स्ट्रीट आर्टवरचा ठसा, मेलबर्न शहरातल्या कलाकारांचं काम अशा अनेक गोष्टी या पुस्तकात येतात, ज्या रसिकांना त्या कलाकृतीचा अनुभव आणि आस्वाद घेण्यास मदत करु शकतात. तुमच्या पर्यटनाचा उद्देश जर त्या त्या शहरांमधल्या वास्तू, कलांचा अभ्यास करण्याचा असेल, त्यातून तुम्हाला आनंद मिळत असेल तर ‘स्ट्रीट आर्ट’ तुमच्यासाठी निश्चित उपयुक्त ठरेल. आणि अगदी लगेच फिरायला जाण्याचा विचार नसेल तर किमान एक चांगल पुस्तक वाचून अप्रत्यक्ष पर्यटनानुभव तर नक्कीच मिळेल.