शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

BLOG: कितीही सफरचंद उचला... निवांत खा... घरी जाताना पिशवी भरून सोबतही न्या..!

By अतुल कुलकर्णी | Updated: October 20, 2021 20:18 IST

कुटुंबासह किंवा मित्रपरिवारासह शेतात जाणे, सफरचंदांच्या बागांमधून फिरणे, झाडाला लागलेले सफरचंद तोडून खाणे हा जो आनंद तुम्हाला मिळतो तो 10 आणि 15 डॉलर्सपेक्षा कितीतरी जास्त असतो.

>> अतुल कुलकर्णी

सफरचंदाच्या उत्पादनात जगात 33 व्या नंबरवर असणारा कॅनडा "ॲपल पीकिंग फेस्टिवल" भरवतो... आणि लोक उत्साहाने त्यात सहभागी होतात...! हे या देशाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. केवळ एवढेच नाही तर भोपळे, द्राक्षे, पिच, स्ट्रॉबेरी गोळा करण्याचेही उत्सव या देशात होतात. तसे ॲपल पिकिंगचे उत्सव अमेरिकेत ही अनेक ठिकाणी होतात. मात्र जगातला सगळ्यात जास्त आंबा भारतात पिकतो, पण आपण आंब्यांच्या प्रसार आणि प्रचारासाठी असे काहीच का करत नाही..?

शुक्रवार, शनिवार, रविवार हे तीन दिवस यासाठी लोक खास राखून ठेवतात. ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यात ॲपल पिकिंग सीजन जोमात असतो. शेतात गेल्यानंतर तुम्हाला दोन प्रकारच्या कॅरी बॅग दिल्या जातात. एक दहा डॉलरला आणि एक पंधरा डॉलरला... तुम्ही कितीही जण असा, तुम्हाला जेवढी सफरचंदं तिथे बसून खायची असतील तेवढी तुम्ही खाऊ शकता... आणि जाताना तुम्हाला दिलेल्या कॅरीबॅगमध्ये जेवढी बसतील तेवढी सफरचंदं सोबतही नेऊ शकता..! त्याशिवाय ॲप्पल साइडर विनेगर, वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन्स देखील तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जातात.

मुळात कुटुंबासह किंवा मित्रपरिवारासह शेतात जाणे, सफरचंदांच्या बागांमधून फिरणे, झाडाला लागलेले सफरचंद तोडून खाणे हा जो आनंद तुम्हाला मिळतो तो 10 आणि 15 डॉलर्सपेक्षा कितीतरी जास्त असतो. अनेक कुटुंब केवळ त्यासाठी आपल्या मुलांना शेतात घेऊन येतात. सफरचंदाची गोष्ट सांगतात. झाड कसे असते, सफरचंद कसे लागतात, वेगवेगळ्या जातीची सफरचंद नेमकी कशी असतात, ती ओळखायची कशी...? याची माहिती देतात. ग्रीन एप्पल आणि लालचुटुक रंगाची वेगवेगळी सफरचंद मुलांना पाहायला आणि खायला मिळतात. ज्या शेतात आपण जातो त्या ठिकाणचे लोक त्यांच्या शब्दात कोणत्या जातीची सफरचंद आहेत हे आधीच सांगतात. त्याची लागवड कुठे केली आहे, तेही सांगतात. प्रत्येक झाडाच्या बुंध्याजवळ एक विशिष्ट रंगाचा झेंडा लावलेला असतो. त्यानुसार कोणती सफरचंद तुम्ही तोडू शकता आणि कोणती तोडता येणार नाहीत हे देखील सांगितले जाते. मिळालेल्या सूचनांचे लोक तंतोतंत पालन करतात हे विशेष...!

कॅनेडियन जिओग्राफिक जर्नलच्या 1938 च्या अंकात एम.बी. डेव्हिस आणि आर.एल. व्हीलर यांनी त्यावेळी लिहिले होते की, "अनावश्यक निराशावादाशिवाय, कॅनेडियन सफरचंद उत्पादक वस्तुस्थितीला गंभीरपणे तोंड देतात," हे वाक्य आजही इथल्या सफरचंदाच्या बागांमध्ये फिरताना जाणवते. फेडरल सरकारने त्यावेळी सफरचंदाच्या लागवडीसाठी मोहीम सुरू केली आणि आज फक्त ओंटारियोमध्ये जवळजवळ 20 वेगवेगळ्या प्रकारच्या सफरचंदांची लागवड केली जाते. नोव्हा स्कॉशिया कॅनडाच्या सुरुवातीच्या सफरचंदाशी निगडित इतिहासावर स्वतःचा दावा करू शकतो, परंतु न्यू ब्रंसविक, क्यूबेक, ओंटारियो आणि ब्रिटिश कोलंबिया हे देखील या उद्योगातील प्रमुख खेळाडू बनले आहेत. 

सफरचंदांची लागवड करण्याची सुरुवात कॅनडात फ्रेंच वसाहतींनी केली होती. पहिली लागवड केलेली झाडे 1633 च्या आसपास नोव्हा स्कॉशियाच्या ऍनापोलिस व्हॅलीमध्ये दिसली होती. पुढे सीमेच्या दक्षिणेकडील वाण बाजारात येऊ लागले. नंतर अमेरिकेने त्यांच्याकडे उत्पादित होणारे सफरचंदाचे वाण कॅनडा आणले आणि येथे वेगवेगळ्या जातीची सफरचंदे पाहायला मिळू लागली. सफरचंद उत्पादनात चीन जगात नंबर एकचा देश आहे. 2020 पर्यंत, चीनमध्ये सफरचंदाचे उत्पादन 40.5 दशलक्ष टन होते. जे जगातील सफरचंद उत्पादनाच्या 63.63% आहे. तुलनेने सफरचंद उत्पादनात 33 व्या नंबरवर असणाऱ्या कॅनडामध्ये यावरून उत्सवी माहोल पहायला मिळतो. 

भारत हा आंब्याचा सर्वात मोठा उत्पादक असला तरी आंतरराष्ट्रीय आंब्याच्या बाजारपेठेत आपला वाटा 1% पेक्षा कमी आहे. भारतात आंब्याचे जेवढे उत्पादन होते ते सगळेच्या सगळे भारतात वापरले जाते. आपल्याकडे आंब्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत. आपला हापूस आंबा हा जगात प्रसिद्ध असला तरी तो भारतीय बाजारपेठेच्या बाहेर फारसा जात नाही. आपण देखील किंवा आपले सरकारही आंब्याच्या लागवडीला प्रोत्साहन देणारे निर्णय घेताना दिसत नाही. आपल्याकडे जर आंब्यांच्या बागांमधून "मँगो पीकिंग फेस्टिवल" सारखे उपक्रम सुरू केले तर एकट्या कोकणात या माध्यमातून एक वेगळे आर्थिक वातावरण घडताना दिसेल. पण त्यासाठी जाणीवपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना विश्वासात घेत सरकारने राजकीय इच्छाशक्ती दाखवली पाहिजे. माध्यमांना अशा उपक्रमांसाठी सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे. विदर्भात संत्रा फेस्टिवल, कोकणात आंबा महोत्सव, आणि नाशिक सारख्या भागात द्राक्ष महोत्सव जर अशा पद्धतीने साजरे होऊ लागले, तर एक वेगळे चित्र सहज पाहायला मिळेल..! तुम्हाला काय वाटते...?

(लेखक 'लोकमत'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत.)