शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

जगभरातल्या पर्यटकांची पसंती ताजमहाललाच. जगातील भव्य दिव्य दहा वास्तूंच्या यादीमध्ये भारतातला ताजमहाल पाचव्या क्रमांकावर.

By admin | Updated: June 7, 2017 18:12 IST

प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल Travellers’ Choice awards for Landmarks च्या यादीमध्ये पाचव्या स्थानावर आहे.

ताजमहालच्या शिरपेचात मनाचा तुरा जगातील भव्य दिव्य दहा वास्तूंच्या यादीमध्ये भारतातला ताजमहाल पाचव्या क्रमांकावर.- अमृता कदमपरदेशी लोकांसाठी भारतातलं मुख्य आकर्षण असतं ते ताजमहाल. भारतात येणाऱ्या सर्वाधिक विदेशी पर्यटकांची पसंती ही ताजमहाललाच असते. शुभ्र संगमरवरातली ही वास्तू म्हणजे मुघलकालीन वास्तूरचनेचा एक अप्रतिम नमुना आहे. त्यामुळेच जगातील आश्चर्यांमध्येही ताजमहालचा समावेश होतो. ताजमहालच्या या कीर्तीत अजून एका मानाची नोंद झाली आहे. जगातील भव्य-दिव्य अशा दहा वास्तूंच्या यादीमध्ये ताजमहालनं स्थान पटकावलं आहे. प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू Travellers’ Choice awards for Landmarks च्या यादीमध्ये पाचव्या स्थानावर आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या यादीत जागा मिळवणारी ही भारतातील एकमेव वास्तू आहे.

 

                या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहे कंबोडियामधलं अंगोर वॅट. 400 एकरांच्या परिसरात पसरलेली ही वास्तू एक प्रकारचं ‘टेम्पल कॉम्पलेक्स’ आहे. दुसऱ्या स्थानावर आहे अबू धाबीमधल्या शेख झायेद ग्रँड मॉस्क सेंटर तर तिसरा क्र मांक मिळवला आहे स्पेनमधल्या मेझक्विटा कॅथेड्रीलनं. इटलीमधली चर्चेस ही पर्यटकांबरोबरच इतिहास आणि वास्तुशास्त्राच्या अभ्यासकांसाठीही औत्सुक्याचा विषय आहे. त्यामुळेच व्हॅॅटिकन सिटीमधल्या सेंट पीटर्स बॅसिलिकाला या यादीत चौथा क्र मांक मिळाला आहे.

 

        या भव्य दिव्य वास्तूंच्या यादीमध्ये रशियातलं सेंट पीटर्सबर्ग चर्च, चीनची भिंत, पेरूमधलं माचू-पिचू, स्पेनमधल्या प्लाझा दि इस्पाना आणि इटलीतल्या द्युमो दी मिलानोचाही समावेश झाला आहे. एकूणच या यादीवर नजर टाकली तर स्पेन आणि इटलीनं बाजी मारल्याचं दिसत आहे. कारण या दोन्ही देशांतल्या प्रत्येकी दोन वास्तूंनी या यादीत जागा मिळवली आहे.

 

              आशियातील भव्य वास्तूंचा विचार केला तर ताजमहालचा क्र मांक दुसरा लागतो. पहिलं स्थान कंबोडियामधल्या अंग्कोर वॅटनेच परत पटकावलं आहे. खरंतर भारतात अशा अनेक वास्तू आहे ज्यांची रचना आणि सौंदर्य हे पाहणाऱ्याला आवाक करतं. पण तरीही यादीत भारतातला ताजमहालच का? असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. याचं उत्तर जितकं ताजमहालचं सौंदर्य आहे तितकं ते सौंदर्य जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून पुरवलं जाणारं लक्षही आहे. आज ताजमहालच्या तोडीचं सौंदर्य भारतात आहे गरज आहे ती ते सौंदर्य टिकवण्याची, जतन आणि संवर्धन करण्याची. आणि तितकीच गरज आहे ताजमहालची किर्ती जशी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली तशी भारतातल्या इतर प्रसिध्द वास्तूंची प्रसिध्दीही जगभरात पोहोचवण्याची!. हे जमलं तर जगातील भव्य दिव्य वास्तूंच्या यादीत भारतातून ताजमहाल हा एकटाच नसेल !