शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

भर उन्हाळ्यात ट्रेकिंगची लहर आलीय, मग या पाचातून एकाची निवड करा!

By admin | Updated: May 9, 2017 17:33 IST

महाराष्ट्राच्याच डोंगरखोऱ्यात अशी ठिकाणं आहेत,जिथे तुम्ही उन्हाळ्यातही ट्रेकिंगला जाऊ शकता.

 

-अमृता कदम

उन्हाळा आणि ट्रेकिंग हे दोन शब्द सोबतीनं उच्चारले तरी दमछाक होईल. मग उन्हाळ्यात तेही अगदी रणरणत्या मे महिन्यात ट्रेकिंगला जाण्याचा विचार तर लांबच! पण जर तुम्ही शारीरिक क्षमतेच्या मुलभूत निकषांनुसार तंदुरु स्त असाल आणि उन्हाळा सहन करण्याची तुमची तयारी (अर्थातच योग्य ती काळजी घेऊनच) असेल तर महाराष्ट्राच्याच डोंगरखोऱ्यात अशी ठिकाणं आहेत,जिथे तुम्ही उन्हाळ्यातही ट्रेकिंगला जाऊ शकता.

1.राजमाची

लोणावळ्यापासून अवघ्या 15 किलोमीटरवर असलेलं हे ठिकाण. राजमाची किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत.. श्रीवर्धन आणि मनरंजन. राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना ‘कातळदरा’ ही खोल दरी आहे. शिवाय दोन्ही बालेकिल्ल्यांकडे जाताना वाटेत खोदलेल्या गुंफाही आढळतात. असं हे ठिकाण वर्षभर सुंदरच असतं. राजमाचीच्या अगदी पोटातच कोंडाणे लेणी आहेत. ही लेणी सातवाहनकालीन आहेत. त्याचबरोबर किल्ल्यावर उदयसागर तलाव आणि शंकराचं एक मंदिरही आहे. अगदी सकाळी लवकर तुम्ही चढायला सुरूवात केलीत, तर हा ट्रेक एका दिवसातही पूर्ण होऊ शकतो. काही खड्या चढणी असल्या तरी तुलनेनं हा ट्रेक सोपा आहे. तुम्ही अगदी सराईत ट्रेकर नसला तरी हा ट्रेक पूर्ण करु शकता. सोबत पुरेसं पाणी घ्यायला मात्र अजिबात विसरु नका. तुम्हाला मुक्कामी जायचं असेल तर आजूबाजूच्या गावांतही राहण्याची सोय होऊ शकते.

 

                        

2.लोहगड

नवशिक्या ट्रेकर्ससाठी अगदी योग्य ठिकाण. ट्रेकिंगचा अगदी दोन-तीन दिवसांचा वेळ काढूनही तुम्ही इथे जाऊ शकता. कारण लोहगड-विसापूर हे जुळे गड तसंच तुंग-तिकोना असा एक भरगच्च कार्यक्रमही होऊ शकतो. पुण्यापासूनचं अंतर 52किलोमीटर आणि मुंबईपासून 94 किलोमीटर. चालत चालत दीड तासाचा रस्ता. त्यातही अगदी वरपर्यंत जायला पायऱ्या असल्यामुळे फार घाम गाळावा लागत नाही. पवना डॅम तसंच आजूबाजूच्या परिसराचं विहंगम दृश्य यांमुळे वर गेल्यावर सगळा थकवा दूर होतो. किल्ल्याला पाच दरवाजे आहेत. लक्ष्मीकोठी, एक दर्गा, देऊळ, नाना फडणवीसांनी बांधलेला सोळा कोनी तलाव असं बरंच काही किल्ल्यावर पहायला मिळतं. शिवाय इथल्या बारमाही टाक्यातलं थंड पाणी तुमची तहान अगदी शांत करतं.

 

                      

 

 

3.तिकोना

याचंच दुसरं नाव वितंडगड. या गडाचा माथा त्रिकोणी असल्यामुळे याचं नाव तिकोना. कामशेतपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या तिकोन्याचा ट्रेक अवघ्या तासाभराचा. त्यामुळे मुंबई-पुण्यापासून जवळ असलेलं ठिकाण तुम्ही ट्रेकिंगसाठी शोधत असाल तर तिकोना उत्तम पर्याय ठरतो. तिकोना पेठेपासून वर जायला गाडीरस्ता आहे. नंतर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. एक सरळ, उभ्या चढणीची, तर दुसरी लांबची, गडाच्या डावीकडील खिंडीतून वर जाणारी सोपी वाट. मारूतीची मूर्ती, तळजाई लेणी, टाक्यातलं गोड पाणी, तिकोन्याच्या बालेकिल्ल्यावरचं त्र्यंबकेश्वराचं मंदिर. त्यामुळे ट्रेकिंगचा सगळा शिणवटाच दूर होऊन जातो.

 

              

4.रतनगड

प्रवरा नदीचं उगमस्थान असलेला हा किल्ला आहे. एकीकडे घनदाट जंगल आणि दुसरीकडे भंडारदऱ्याचा विस्तीर्ण जलाशय असा हा निसर्गरम्य परिसर आहे. रतनगडावर जाण्याआधी पायथ्याशी असलेल्या रतनवाडीत अमृतेश्वर मंदिराला भेट देता येते. पुढे शिडीच्या मार्गानं गडावर जाताना प्रवरा नदीचे पात्रच आपल्यासोबत वाहत आहे असा भास होतो. शिडीच्या वाटेनं गडावर जायला दोन तास लागतात. दुसरी वाट रतनगड आणि खुट्टा सुळका यांमधून जाते. या वाटेनं गडावर जाताना कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. ही वाटही सोपी आहे. गडावर पिण्याच्या पाण्याची सोय असली तरी जेवणाची सोय गडावर किंवा वाटेत नाहीये. त्यामुळे इथे जाताना खाण्याचं सामान सोबत असणं केव्हाही चांगलं.

 

            

5.विकटगड

नाव विकट असलं तरी ट्रेक सोपा आहे. मुंबईपासून जवळ असलेल्या विकटगडचा ट्रेक एका दिवसात पूर्ण होऊ शकतो. पण तुमच्याकडे वेळ असेल तर हा ट्रेक आणि माथेरानची एकदिवसाची ट्रीप असा प्लॅनही तुम्ही करु शकता. कारण नेरळपासून विकटगड अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर आहे. विकटगडाकडे जाणाऱ्या वाटेवर काही ठिकाणी पायऱ्या आहेत तर काही ठिकाणी दगडी वाटा. घनदाट हिरवाई, गुफा अशी निसर्गाची मजा घेत तुम्ही वर पोहचता. चढताना सोबत थोडे खाण्याचे पदार्थ आणि भरपूर पाणीही ठेवायला विसरु नका. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मित्रमंडळींसोबत या ठिकाणी एक मस्त वीकेण्ड प्लॅन होऊ शकतो.