शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

हिमवर्षावाची मजा घेण्यासाठी परदेशात नको देशातच फिरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 18:05 IST

हिमवर्षावाचा आनंद घेण्यासाठीफार लांब विदेशात जायची मुळीच गरज नाही. भारतातही अशी स्वर्गीय सौंदर्यानं नटलेली ठिकाणं आहेत. ही मजा अनुभवण्यासाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत.

ठळक मुद्दे* कसौलीतल्या पवर्तराजीवर आणि नद्यांवर थंडीच्या दिवसात बर्फाची चादर पसरते. बर्फाची मजा लुटण्यासाठी पर्यटकांचं हे सर्वात आवडतं ठिकाण.* औलीच्या पर्वतरांगांमध्ये स्नो फॉलचा मनमुराद आनंद लुटता येतो. शिवाय या सुंदर ठिकाणाची अनेकांना माहितीच नसल्यानं इथे वर्दळीचाही त्रास होत नाही.* मुनस्यारी हे उत्तराखंडच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं एक सुंदर ठिकाण. इथे गेल्यानंतर युरोपातल्याच कुठल्या तरी देशात पोहोचल्याचा भास होतो.

- अमृता कदम

हिमवर्षावाची मजा घ्यायला सर्वांनाच आवडतं. पण हिमवर्षावाचा अनुभव घ्यायला असेल तर परदेशात जायला हवं असा अनेकांचा समज आहे. खरंतर हिमवर्षावाचा आनंद घेण्यासाठीफार लांब विदेशात जायची मुळीच गरज नाही. भारतातही अशी स्वर्गीय सौंदर्यानं नटलेली ठिकाणं आहेत जिथे हिमवर्षावाची मजा अनुभवता येते. ही मजा अनुभवण्यासाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. यावर्षी नसेल जमणार तर पुढच्या वर्षी फिरण्यासाठी तुम्ही यातलं कोणतं तरी ठिकाण नक्कीच निवडू शकता. 

 

कसौली

हिमाचल प्रदेशातल्या सर्वांत सुंदर ठिकाणांपैकी एक. इथल्या पवर्तराजीवर आणि नद्यांवर थंडीच्या दिवसात बर्फाची चादर पसरते. बर्फाची मजा लुटण्यासाठी पर्यटकांचं हे सर्वात आवडतं ठिकाण.कसौलीपासून सर्वात जवळ असलेलं एअरपोर्ट चंदिगढ आहे. तिथून कसौली 65 किलोमीटर अंतरावर आहे. ट्रेननं जायचं असेल तर दिल्लीहून कालकासाठी दिवसांतून जवळपास 5 गाडया आहेत. हिमालयन क्वीन, कालका शताब्दी, पश्चिम एक्सप्रेस आणि हावडा-दिल्ली-कालका मेल यापैकी कुठल्याही ट्रेननं तुम्ही कालकापर्यंत जाऊ शकता. तिथून पुढे कालका ते शिमला मार्गावर धर्मपूर स्टेशनपर्यंत ट्रेनचा प्रवास करावा लागतो. 

औली

नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान फिरण्यासाठी उत्तराखंडमधलं हे उत्तम ठिकाण. औलीच्या पर्वतरांगांमध्ये तुम्ही स्नो फॉलचा मनमुराद आनंद लुटू शकता. शिवाय या सुंदर ठिकाणाची अनेकांना माहितीच नसल्यानं इथे वर्दळीचाही त्रास होत नाही.औलीला पोहचण्यासाठी हवाई, रेल्वे तसे रस्तेमार्गाचे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. डेहराडूनचं एअरपोर्ट इथून जवळ आहे. हरिद्वार हे जवळंच मोठं रेल्वे स्टेशन आहे. औलीला पोहचण्यासाठी अनेक शहरांमधून थेट बसचीही सोय उपलब्ध आहे.

धनौल्टीथंडीचा आनंद घेण्यासाठी देशभरातले पर्यटक इथे येत असतात. मसुरी-मनाली फिरु न झालेलं असेल तर तिथून जवळच असलेल्या या जागेचा पर्याय तुम्हाला काहीतरी नवं पाहिल्याचा आनंद देईल.दिल्लीहून धनौल्टीला जाण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे ट्रेनचा. नवी दिल्ली स्टेशनवरु न सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी शताब्दी एक्सप्रेस उपलब्ध आहे. जी 12वाजून 40 मिनिटांनी डेहराडूनला पोहचवते. इथे थोडासा लंचब्रेक करून तुम्ही टॅक्सीनं अगदी दोन तासांच्या आत धनौल्टीला पोहचू शकाल. 

मुनस्यारीउत्तराखंडच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं हे आणखी एक सुंदर ठिकाण. समुद्रसपाटीपासून 2250 मीटर अंतरावर वसलेलं हे ठिकाण. या ठिकाणी डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान अगदी तुफान बर्फवृष्टी होते. या काळात तुम्ही इथे पोहचलात तर युरोपातल्याच कुठल्या तरी देशात पोहोचल्याचा भास होईल.काठगोदाम हल्दवानी रेल्वे स्टेशनपासून मुनस्यारी जवळपास 295किलोमीटर अंतरावर तर नैनीतालपासून 265 किलोमीटर अंतरावर आहे. तिथून पुढे बस किंवा टॅक्सीनं या ठिकाणी पोहोचता येतं.