शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
4
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
5
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
6
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
7
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
8
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
9
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
10
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
11
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
12
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
13
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
14
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
15
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
16
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
17
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
18
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
19
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
20
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान

पावसाळी ट्रिप प्लॅन करता आहात का? मग या 5 गोष्टींचा आधी विचार करा.

By admin | Updated: June 30, 2017 17:21 IST

पावसाळ्यातलं निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी फिरायला जाण्याची तयारी तुम्ही करत असाल तर या गोष्टींचा नीट विचार करा

 

- अमृता कदम

उन्हानं त्रस्त झालेल्या शरीराला आणि मनाला पावसाच्या सरींनी नक्कीच थंडावा मिळाला असेल. पावसामुळे निर्माण झालेला उत्साह , सृष्टीतलं चैतन्य तुम्हाला घरातून बाहेर पडायला उद्युक्त करतोय का? पावसाळ्यातलं निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी फिरायला जाण्याची तयारी तुम्ही करत असाल तर थोडं थांबा! काही गोष्टींचा नीट विचार करा आणि मगच ट्रीप प्लॅन करा.

 

            

* सगळ्यांत आधी स्वत:ला एक प्रश्न विचारा ‘आपण खरंच पाऊस एन्जॉय करतो का ?’ किंवा ‘करणार आहे का?’

खिडकीत बसून वाफाळता चहा आणि भज्यांच्या प्लेटसोबत पावसाचा आनंद घेणं वेगळं आणि धो-धो कोसळत्या पावसात भिजत वाटा तुडवणं वेगळं! त्यामुळेच पावसाचे चार थेंब अंगावर पडल्यानंतर जर तुम्ही आडोसा शोधायला धावत असाल तर तुम्ही मान्सून ट्रीपला जाण्याचा पुनर्विचार करा. बाकी करतात म्हणून केवळ थ्रील शोधण्यासाठी मान्सून ट्रीप प्लॅन करु नका. तुम्ही मनापासून त्याचा आनंद घेऊ शकणार नाही.

* सुरक्षिततेला प्राधान्य द्या

पावसाळ्यांमध्ये पर्वतरांगांमध्ये फिरायला जात असाल किंवा ट्रेकिंगला जात असाल तर स्वत:ची काळजी घ्या. पावसाळ्यात वाटा-रस्ते निसरडे झालेले असतात. घाटातले रस्ते असतील तर दरडी कोसळण्याचाही धोका असतो. त्यामुळेच गाडी चालवताना काळजी घ्या. पावसात गाडी हळू चालवा. मायकेल शूमाकर बनून गाडी पळवण्याची काही गरज नाही. जर तुम्ही समुद्रकिनारी असाल तर समुद्रात पोहायला जाण्याचा मोह आवरलेलाच बरा. पावसाळ्यात काही बीचेसवर सुरक्षेच्या कारणामुळे पर्यटन पूर्णपणे बंद असतं. त्यामुळे नेटवरून आधी माहिती पक्की करूनच फिरायला जा. तसेच पावसाळ्यात जिथे जात असू तिथले नियम पाळा. एखाद्या ठिकाणी स्थानिक सूचना करत असतात. त्यांच्या सूचना अव्हेरून पुढे जाणं धोक्याचं असतं. तेव्हा पावसाळ्यातल्या आनंदाला थोडी नियमांची चौकट आखून घ्या.

* ओळखीच्या रस्त्यावरूनच रोड ट्रीप करा

जर तुम्हाला रोड ट्रीपची आवड असेल, खिडक्या खाली करून चेहऱ्यावर आदळणारा गार वारा आणि विंडस्क्रि नमधून दिसणारे काळे ढग अनुभवण्याहून अधिक सुखद काहीच नाही. पण त्याचबरोबर एखाद्या आडवाटेला चिखलानं माखलेल्या रस्त्यावर अडकून पडण्यासारखा त्रासदायक अनुभवही दुसरा कोणता नाही. त्यामुळेच पावसाळ्यात ट्रीप प्लॅन करताना तुम्ही नेहमी हायवेने किंवा हमरस्त्यानेच प्रवास करा. शिवाय एक्साईटमेंटच्या नादात फारशा माहित नसलेल्या अनवट वाटांनी किंवा रहदारी नसलेल्या रस्त्यांवरु न प्रवास करणं टाळा.

विलंबाचीही तयारी ठेवा

पावसाळ्यात फ्लाइटनं प्रवास करणं हे नक्कीच समंजसपणाचं नाही. कारण पावसाळ्यात बऱ्याचदा खराब हवामानामुळे विमानांना विलंब होण्याची शक्यता असते. तसंच विमान रद्दही होऊ शकतात. रस्त्यानं प्रवास करतानाही पावसाळ्यातले अपघात, निरसडे झालेले रस्ते यांमुळे तुम्हाला ट्रॅफिक जॅममध्ये अडकूनही पडावं लागू शकतं. त्यामुळेच पावसाळ्यात प्रवास करताना तुमचा प्रवास कंटाळवाणा करु शकणाऱ्या या शक्यतांचाही विचार करून ठेवा! म्हणजे प्रवास करताना चिडचिड कमी होईल.

* स्मार्ट पॅकिंग करा

पावसाळ्यात फिरायला जाताना केवळ छत्री बाळगणं योग्य नाही. तुम्ही भर पावसात जंगलामधून फिरणार असाल किंवा ट्रेकिंग करणार असाल तर चांगल्या प्रतीचा रेनकोट किंवा टोपी असलेलं वॉटरप्रूफ जाकिट नक्की जवळ ठेवा. शिवाय पावसाळ्यात प्रवासात जे कपडे सोबत घ्याल ते पटकन सुकणारे असावेत. सामानात मॉस्केट्यू रिपेलन्ट आणि तुमच्या नाजूक इलेक्ट्रॉनिक सामानासाठी सिलिका जेलही ठेवायला विसरु नका. सिलिका जेलमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू मॉईश्चर पकÞडत नाही. सोबत पावसाळी शूजही असू द्या. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे हे सर्व सामान ठेवण्यासाठी जी बॅग घ्याल ती वॉटरप्रूफ असावी. पावसाळ्यांत सगळ्या सृष्टीमध्ये एक ताजेपणा वाहात असतो. वातावरणातला हा ताजेपणा तुम्हालाही उल्हासित करेल. गरज आहे ती फक्त विचारपूर्वक ट्रीप प्लॅन करण्याची!