शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जादुई रात्रींची दुबई एकदा अनुभवायलाच हवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 18:07 IST

जगातली नाइटलाइफसाठी जी मोजकी ठिकाणं प्रसिद्ध आहे त्यातलं एक म्हणजे दुबई. त्यामुळे दुबईमध्ये आल्यावर इथल्या जादुई रात्रीचा अनुभव घ्यायलाच हवा.

ठळक मुद्दे* साधारण रात्री नऊ-साडेनऊनंतर ब-याचदा सामसूम व्हायला लागते. पण या शहरामध्ये रात्री नवीनच चैतन्य पाहायला मिळतं. मध्यरात्रीसुद्धा लोकं तुम्हाला आपल्या घरातून रस्त्यांवर बाहेरची मौज अनुभवण्यासाठी बाहेर पडल्याचं दिसतात.* इथल्या नाइटलाइफला रात्री बाराची डेडलाइन नाहीये. इथले क्लब पहाटे तीन वाजेपर्यंत सुरु असतात. मात्र तीन वाजल्यानंतर क्लब बंद करावेच लागतात.* दुबईतल्या अनेक नाइटक्लब, बार आणि रेस्टॉरण्टमध्ये तुम्हाला भारतीय लुक पाहायला मिळतो. विशेष करु न ‘बॉलिवूड बार’ आणि‘चिल रुफटॉप’ या क्लबचा परिसर अतिशय सुंदर आहे. तुम्हाला खास अरबी वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर ‘डीरा क्लब’ ही योग्य जागा आहे.

- अमृता कदमदुबई हे जगभरातल्या पर्यटकांचं आकर्षण आहे. या आकर्षणाचं कारण म्हणजे शॉपिंग आणि इथलं नाइटलाइफ. जगातली नाइटलाइफसाठी जी मोजकी ठिकाणं प्रसिद्ध आहे त्यातलं एक म्हणजे दुबई. त्यामुळे दुबईमध्ये आल्यावर इथल्या जादुई रात्रीचा अनुभव घ्यायलाच हवा. 

नऊनंतर जागं होणारं दुबईसाधारण रात्री नऊ-साडेनऊनंतर ब-याचदा सामसूम व्हायला लागते. पण या शहरामध्ये रात्री नवीनच चैतन्य पाहायला मिळतं. मध्यरात्रीसुद्धा लोकं तुम्हाला आपल्या घरातून रस्त्यांवर बाहेरची मौज अनुभवण्यासाठी बाहेर पडल्याचं दिसतात.त्यामुळेच इथले बार आणि नाइटक्लब नेहमी हाऊसफुल्ल असतात. इथे अगदी हरप्रकारचे बार आणि नाइटक्लब उपलब्ध आहेत. जुनी दुबई आणि नव्या दुबईतल्या जुमेरा, अल बारशासारख्या काही ठिकाणी अत्यंत आरामदायी हॉटेल्स उपलब्ध आहेत. तुमचा पार्टीचा मूड असेल तर औद मीता, अल रिगा आणि अल करामा या परिसरात तुम्हाला पार्टीची सर्वांत जास्त ठिकाणं आढळतील. 

 

पहाटे 3 वाजता बंद होतात इथले क्लब

इथल्या नाइटलाइफला रात्री बाराची डेडलाइन नाहीये. इथले क्लब पहाटे तीन वाजेपर्यंत सुरु असतात. मात्र तीन वाजल्यानंतर क्लब बंद करावेच लागतात. निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ क्लब चालू राहिला तर चालकाला भरभक्कम दंड भरावा लागतो. शिवाय दुबईमध्ये मद्यसेवनासाठी किमान 21 वर्षे वयाची अट आहे. जे बार किंवा हॉटेल्स यापेक्षा कमी वयाच्या तरु णांना मद्यपानाची सेवा देतात त्यांच्याविरोधात कारवाई केली जाते.पण दुबईला जाताना एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती म्हणजे रमझानच्या काळात तुम्ही दुबईच्या टूरवर जाणार असाल तर नाईट क्लब सुरु आहेत की नाहीत याची खात्री करा. कारण बहुतांश नाईटकल्ब हे या काळात बंद असतात. 

नाईट क्लबची न्यारी दुनिया

दुबईतल्या अनेक नाइटक्लब, बार आणि रेस्टॉरण्टमध्ये तुम्हाला भारतीय लुक पाहायला मिळतो. विशेष करु न ‘बॉलिवूड बार’ आणि‘चिल रुफटॉप’ या क्लबचा परिसर अतिशय सुंदर आहे. तुम्हाला खास अरबी वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर ‘डीरा क्लब’ ही योग्य जागा आहे. ‘अल जुमोरोफ’ हा अरबी नाईट क्लब तर ‘अल मुशिफक’ हा इराणी नाईट क्लबही इथे आहे. इथल्या ‘रॉयल मिराज’ हॉटेलमधला ‘कस्बा नाइट क्लब’ हा अत्यंत प्रसिद्ध आहे. हा मोरोक्को थीमवर आधारित क्लब आहे. दुबईतला सर्वांत मोठा क्लब म्हणूनही त्याची ख्याती आहे.

वाइनचे प्रसिध्द ब्रॅण्डदुबईमध्ये ‘वेस्ट इन हॉटेल’मधली ओनो वाईन बार ही अशी जागा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला अगदी एकाहून एक सरस अशा वाईनचे ब्रॅण्डस टेस्ट करायला मिळतात. ‘बारस्टी बार’ हा समुद्र काठावर असलेला बार. इथून तुम्ही अगदी समुद्राच्या लाटांचा आनंद घेत वाइनची चव चाखू शकता. इथल्या मोठ्या स्क्र ीनवर अनेक लाइव्ह स्पोर्टस इव्हेण्टसही दाखवले जातात. वाइनसोबत या इव्हेण्ट्सचा आनंद घ्यायला इथे हजारोंनी लोक जमतात. डीजे म्युझिकच्या तालावर कॉकटेल आणि स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेत दोस्तमंडळींसोबत रात्रभर गप्पा मारण्याचा अनुभव तुम्हाला इथे मिळेल.

 

 

देशविदेशातल्या पर्यटकांचं आकर्षणदुबईतले अनेक हॉटेल हे नाईट क्लब आणि नाइटलाइफसाठी प्रसिद्ध झालेत. या नाइटक्लबमध्ये जर्मन आणि इंग्रजी पबसोबतच रशियन डिस्कोचाही अनुभव तुम्ही घेऊ शकता. दुबईच्या खाडीजवळच एक एविएशन क्लबही आहे. उत्तम बिअरसाठी ही जागा प्रसिद्ध आहे. जुमेराह कॉम्प्लेक्स, अटलांटिस यासारख्या ठिकाणी काही हायटेक डिस्कोही आहेत. दुबई मरीना परिसरात जवळपास चाळीस वेगवेगळे बार आणि लाऊंज आहेत. देशविदेशातले पर्यटक इथे फिरण्यासाठी येत असतात.दुबईसाठीच्या टूरिस्ट मॅन्युअल्समध्ये कदाचित तुम्हाला इथल्या नाइट-लाइफबद्दल फार माहिती मिळणार नाही. त्यामुळेच जर दुबईच्या जादुई रात्रींचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही स्वत: त्याबद्दलची माहिती गोळा करा आणि त्यानुसारच दुबईची ट्रीप प्लॅन करा.