शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

स्वत:सोबत आणि स्वत:साठी थोडं जगायचय मग मस्तपैकी एकट्यानं भटकून या! लोकं प्रश्न विचारतील पण उत्तरंही तयार ठेवा!

By admin | Updated: May 26, 2017 17:47 IST

सोलो ट्रीप किंवा एकट्यानंच अगदी लांबच्या ठिकाणी प्रवासाला निघणं ही काही आता नवलाईची गोष्ट राहिलेली नाही.तुम्हीही करून बघा !

 

- अमृता कदम

फिरायला जायचं म्हटलं की सुट्टयांचं नियोजन, तिकीटाचं बुकिंग, हॉटेल बुकिंग अशा एक ना अनेक गोष्टींचं काटेकोर नियोजन केलं जातं. पण असं कोणतंही प्लॅनिंग न करता, मस्तपैकी भटकायची लहर आल्यामुळे पाठीवर बॅगपॅक टाकून अगदी अडनिडं ठिकाण गाठणारे मस्तमौला भटकेही असतात. सोलो ट्रीप किंवा एकट्यानंच अगदी लांबच्या ठिकाणी प्रवासाला निघणं ही काही आता नवलाईची गोष्ट राहिलेली नाही. पण तरीही अशा भटक्यांना लोकांच्या अनेक प्रश्नांना आणि चौकशांना सामोरं जावं लागंत. तुम्ही जर असेच प्रवासवेडे असाल तर तुम्हाला विचारल्या जाणाऱ्या काही कॉमन प्रश्नांसाठी तयारीत राहिलेलं चांगलं!

 

         

तुला कोणी मित्र नाही का?

एकट्यानं अशा उचापती करण्याची गरजच काय? असा प्रश्न विचारणाऱ्यांना सांगा की मला मित्र-मैत्रिणी आहेत. पण मला स्वत:साठी वेळ द्यायला आणि स्वत:सोबत वेळ घालवायला आवडतं. शिवाय एकट्यानं प्रवास करताना तुम्ही तुमच्या व्यक्तीमत्त्वाचे वेगवेगळे पैलू तपासून पाहता. स्वत:ला शोधण्याचा प्रवास हा उत्तम मार्ग आहे.

मुलींसाठी असं एकट्यानं भटकणं सुरक्षित नाही.

कोणाची तरी सोबत असेल तरच तुम्ही सुरक्षित असता ही कल्पनाच आता मागे पडतीये. जर काही वाईट घडणार असेल तर ते सोबत असतानाही होऊच शकतं. तुम्ही प्रवासाचं नीट नियोजन केलं असून स्वत:च्या सुरक्षिततेसाठीची खबरदारीही व्यवस्थित घेतली असल्याचं सांगून तुमच्या पालकांना आणि मित्रमंडळींना तुम्ही निश्चिंंत करु शकता. सुरक्षेसाठीच्या वेगवेगळ्या अ‍ॅपची माहिती तुम्ही तुमच्या पालकांना द्या. तसंच तुम्ही जिथे राहत आहात तिथली नीट माहिती त्यांना देऊन ठेवा.

 

       

एकट्यानं फिरणं कंटाळवाणं.असतं का ?

अजिबात नाही! सध्याच्या जगात कंटाळा येणं ही तशी दुर्मिळच गोष्ट झाली आहे. जेव्हा तुम्ही फिरत असता तेव्हा तुम्ही नवीन लोकांना भेटत असता, नवनवीन ठिकाणं पाहत असता आणि वेगवेगळ्या अनुभवांना सामोरं जात असता. यातून जो काही वेळ उरतो, तेव्हा स्मार्ट फोन आणि अलिबाबाच्या गुहेतल्या खजिन्याप्रमाणे त्यात असणारे असंख्य फीचर्स असतातच! कंटाळ्याचा प्रश्नच कुठे येतो!

 

                  

असं एकट्यानं मजा करणं स्वार्थीपणा नाही का?

या प्रश्नावर तर ठामपणे ‘नाही’ असंच उत्तर द्या. एकट्यानं मजा करणं स्वार्थीपणा नाही तर मला आयुष्यात एकट्यानं हा आनंद घेऊ न देणं हा स्वार्थीपणा आहे हे असं तुम्ही नि:संकोचपणे म्हणू शकता. एकलकोंडी लोकंच अशी एकटी भटकतात का? खरंतर ज्याला कोणालाही स्वत:ची कंपनी मनापासून एन्जॉय करता येते, अशी व्यक्ती एकट्यानं फिरु शकते. त्यामुळे लगेचच स्वत:ला एकलकोंडं किंवा माणूसघाणं समजण्याचं काही एक कारण नाही. इतर कोणाच्याही आधी स्वत:ला प्राधान्य देणं गैर नाही. त्यामुळे लोकांच्या या आणि अशा प्रश्नांना बिनधास्त सामोरं जा. कुछ तो लोग कहेंगे असं म्हणत अशा शंकासुरांचं म्हणणं फार मनाला लागू न देता मस्तपैकी फिरायला बाहेर पडा. स्वत:सोबत छान वेळ घालवा.