शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई देशात फिरायला जायचंय तर मग म्यानमार प्लॅन करा! या देशातलं निसर्गसौंदर्य डोळ्यांचं पारणं फेडतं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 18:44 IST

आशियाई देशांमध्ये फिरण्याचा प्लॅन करत असाल आणि सिंगापूर, बँकॉक  आणि दुबईच्या पलिकडचा विचार करत असाल तर त्यासाठी म्यानमार हा नक्कीच उत्तम पर्याय आहे. राजकीयदृष्ट्या अस्थिर असलेला म्यानमार हा देश निसर्ग सौंदर्यानं समृध्द आहे. या छोट्याशा देशात सुंदर पर्यटनस्थळंही आहेत .

ठळक मुद्दे* म्यानमारची राजधानी असलेलं यंगून मुंबईप्रमाणेच गजबजलेलं, बहुआयामी शहर आहे. याच शहरात जगातल्या भव्य पॅगोडांपैकी एक श्वेदागोन पॅगोडा आहे.* बागान म्यानमारमधलं एक प्राचीन शहर आहे. बौद्ध धर्मातलं प्रसिद्ध ठिकाण आनंद मंदिर या शहरात आहे.* म्यानमारमधील हा तलावही पर्यटकांचं प्रमुख आकर्षण आहे. आजूबाजूला हिरव्यागार टेकड्या, चारी बाजूंनी भाताची शेतं आणि त्यांनी वेढलेला हा तलाव. हे दृश्यच डोळ्यांचं पारणं फेडतं.

- अमृता कदमसध्या म्यानमार हा बराच चर्चेत आहे. आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्यानमार भेटीमुळे आणि आता रोहिंग्यांच्या प्रश्नामुळे.राजकीयदृष्ट्या अस्थिर असलेला म्यानमार हा देश निसर्ग सौंदर्यानं समृध्द आहे. या छोट्याशा देशात सुंदर पर्यटनस्थळंही आहेत . भारताच्या शेजारी असलेल्या नेपाळ, भूतान, श्रीलंका या देशांची पर्यटनातली ख्याती तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण आपल्या जवळच असलेल्या म्यानमारमध्येही खूप काही बघण्यासारखं आहे. 

 

 

श्वेदागोन पॅगोडा

म्यानमारची राजधानी असलेलं यंगून मुंबईप्रमाणेच गजबजलेलं, बहुआयामी शहर आहे. याच शहरात जगातल्या भव्य पॅगोडांपैकी एक श्वेदागोन पॅगोडा आहे. या पॅगोड्याचं छत संपूर्णपणे सोन्यानं मढवलेलं आहे. त्यावर हिरे आणि माणकंही मढवलेली आहेत. इथे एक स्तूपही आहे. पाच बुद्धांच्या काही आठवणींचं जतन या स्तूपामध्ये केलं आहे. काकूसंध बुद्धांची छडी, कोणगमी बुद्धांची पाण्याची झारी, कश्यप बुद्धांचं वस्त्र आणि गौतम बुद्धांचे आठ केस या स्तूपात जतन केले आहेत. कन्डोजी तलावाच्या किना-यावर असलेल्या सिन्गुटरा डोंगरावर हा पॅगोडा आहे. तुम्हाला इथूनच संपूर्ण यंगून शहराचं दर्शन होतं. हे ठिकाण पवित्र बौद्ध स्मारक आहे.यंगूनमध्ये या पॅगोड्याखेरीज अनेक छोट्या-मोठ्या बागा आहेत. त्यामुळेच या शहराला ‘गार्डन सिटी आॅफ इस्ट’ म्हणतात.बहादुरशहा जफरची मजारअखेरचा मुघल बादशहा बहादूरशहा जफरला 1857चा उठाव दडपल्यानंतर ब्रिटीशांनी कैद करून यंगूनमध्येच ठेवलं होतं. तिथेच वयाच्या 89व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. त्याला यंगूनमध्येच दफन करून ब्रिटीशांनी त्याची मजार बांधली. आपल्या स्वातंत्र्यलढ्यातला एक महत्त्वाचा दुवा म्हणून भारतीय पर्यटकांसाठी हे ठिकाण महत्त्वाचं आहे. 

 

 

बागान शहर

बागान म्यानमारमधलं एक प्राचीन शहर आहे. बौद्ध धर्मातलं प्रसिद्ध ठिकाण आनंद मंदिर या शहरात आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भारतीय पुरातत्व विभागानं भरपूर मदत केली आहे. केवळ आनंद मंदिरच नाही तर बागानमध्ये बौद्ध धर्माशी संबंधित इतरही प्राचीन मंदिरं आहेत. शिवाय अनेक बौद्ध मठही आहेत. इथल्या प्राचीन बौद्ध परंपरा मोठ्या निष्ठेनं जतन करु न म्यानमारच्या शासकांनी आपली बौद्ध धर्माशी असलेली बांधिलकी जपली आहे. 

 

 

इनले तलाव

म्यानमारमधील हा तलावही पर्यटकांचं प्रमुख आकर्षण आहे. आजूबाजूला हिरव्यागार टेकड्या, चारी बाजूंनी भाताची शेतं आणि त्यांनी वेढलेला हा तलाव. हे दृश्यच डोळ्यांचं पारणं फेडतं. या तलावात मासेमारी चालते आणि विशेष म्हणजे मच्छिमार ही होडी वल्हवण्यासाठी पायांचा वापर करतात. त्यासाठी विशेष प्रकारची वल्हीही बनलेली आहेत. होड्यांमधले बाजार हे या तलावाचं अजून एक वैशिष्ट्य. हे तरंगते बाजार इनले तलावाला एकदम रंगीबेरंगी बनवून टाकतात. हा तलाव इतका विस्तीर्ण आहे, की यामध्ये अनेक छोटी छोटी बेटंही बनलीयेत. 

 

ताऊंगकालत मठम्यानमारमधल्या पोपा पर्वतावरच हा पोपा ताऊंगकालत मठ आहे. इथे पोहचण्यासाठी 777 पाय-या चढून जाव्या लागतात. पण उंचावर गेल्यावर दिसणारा नजारा श्रमपरिहार करतो.आशियाई देशांमध्ये फिरण्याचा प्लॅन करत असाल आणि सिंगापूर, बँकॉक आणि दुबईच्या पलिकडचा विचार करत असाल तर त्यासाठी म्यानमार हा नक्कीच उत्तम पर्याय आहे.