शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

मस्ट व्हिजिट: भारतातल्या या 8 राज्यातले 8 धबधबे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 18:55 IST

या पावसाळ्यामध्ये थोडंसं एडव्हेंचर हवं असेल तर या धबधब्यांपैकी एका ठिकाणी नक्की ट्रीप प्लॅन करा.

ठळक मुद्दे* हिरव्या रंगाच्या नाना छटा आणि पांढरेशुभ्र फेसाळते धबधबे हे दृश्य पाहणाºयाला वेड लावतं.* धबधब्यांच्या निमित्तानं केलेल्या पर्यटनामुळे निसर्गाशी एकरूप होण्याची संधी मिळते.* निसर्गातल्या अदभूततेचा आनंद पावसाळ्यातले धबधबेच देवू शकतात.

- अमृता कदमपावसाळ्यामध्ये सगळ्या सृष्टीमध्ये एक चैतन्य संचारतं. हिरव्या रंगाच्या नाना छटा आणि पांढरेशुभ्र फेसाळते धबधबे. पावसाळ्यात घराबाहेर पडून निसर्गाशी एकरूप होण्यासाठी एवढं निमित्त पुरेसं आहे. भारतातल्या अनेक राज्यांत असे अनेक धबधबे आहेत जिथे मान्सूनमध्ये तुम्ही आवर्जून ट्रीप प्लॅन करु शकता.या पावसाळ्यामध्ये थोडंसं एडव्हेंचर हवं असेल तर या धबधब्यांपैकी एका ठिकाणी नक्की ट्रीप प्लॅन करा. पण हो, अशा ठिकाणी फिरायला जाताना उत्साहाच्या भरात सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करु नका. भलतं साहस जीवावरही बेतू शकतं. त्यामुळे फिरण्याचा, निसर्गातल्या अद्भुताचा आनंद घ्या, पण स्वत:ला जपून!

1) नोहकालीकै धबधबा, मेघालय

भारतात जिथे सर्वाधिक पाऊस पडतो त्या चेरापुंजीपासून हा धबधबा अगदी जवळ आहे.1115 फुटांवरून कोसळणारा हा जलप्रपात भारतातील सर्वांत विशाल धबधबा आहे. एका पठारावर जमा होणारं पावसाचं पाणी या धबधब्याच्या रूपानं कोसळतं. या धबधब्याच्या जलाशयातल्या पाण्याचा रंग एकदम हिरवागार असा आहे. पाऊस ओसल्यानंतर डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात मात्र धबधब्याचा पाण्याचा ओघ काहीसा कमी होतो. त्यामुळे इथे जायचं असेल तर मान्सून पूर्ण भरात असतानाच गेलेलं चांगलं.

 

 

2) चित्रकूट धबधबा, छत्तीसगढ

छत्तीसगढ या राज्याची ख्याती ही पर्यटनासाठी नाही. पण या राज्याला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे. बस्तरमधल्या जगदलपूरजवळ असलेला चित्रकूट धबधबा ‘भारताचा नायगारा’ म्हणून ओळखला जातो. नोहकालीकै धबधबा उंचीच्या दृष्टीनं भारतातला सगळ्यांत मोठा धबधबा आहे, तर चित्रकूट रूंदीच्या दृष्टीनं भारतातला सगळ्यांत मोठा धबधबा आहे. शंभर फूटांवरु न कोसळणाºया या धबधब्याचा विस्तार तब्बल 1000 फुटांवर पसरलेला आहे. ट्रीपोटोच्या आकडेवारीनुसार दर सेंकदाला या धबधब्यातून दोन लाख लिटर इतक्या पाण्याचा विसर्ग होत असतो. आणि या कोसळणाºया पाण्याचा दाब हा 500 हत्तींच्या वजनाएवढा आहे!

 

 

3) जोग धबधबा, कर्नाटक

मान्सून ट्रीपसाठी पर्यटकांची पहिली पसंती ही नेहमीच जोग फॉल्सला असते. उंचीचा विचार केला तर हा भारतातला दुसºया क्र मांकाचा मोठा धबधबा आहे. जगातल्या सर्वांत उंच धबधब्यांच्या यादीत जोग फॉल्सचा क्रमांक 11 वा आहे. कर्नाटकातल्या शिमोगा जिल्ह्यातल्या सागर तालुक्यात हा धबधबा आहे.

 

 

4) होगेनक्केल धबधबा, तामिळनाडू

कावेरी नदीवरचा हा धबधबा तमीळनाडूमधल्या धर्मपुरी राज्यामध्ये आहे. या धबधब्याच्या ठिकाणी आढळणारे कार्बोनाइट खडक हेसर्वांत जुन्या खडकांपैकी आहेत. इथलं स्नान हे आरोग्यासाठी हितकारक असल्यामुळेही अनेक ठिकाणांहून पर्यटक या धबधब्याला भेट देतात. या ठिकाणच्या बोट राइड्सही प्रसिद्ध आहेत.

 

5) दूधसागर धबधबा, गोवा.जगातील अद्भुत मानल्या जाणाºया धबधब्यांपैकी एक आहे दूधसागर. जोग फॉल्सप्रमाणे हा धबधबाही पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. ‘दूधसागर’ या नावातूनच त्याच्या सौंदर्याचं यथार्थ वर्णन होतं. मांडवी नदीवरचा हा धबधबा चार टप्प्यांमधून कोसळतो. या धबधब्यानं गोवा आणि कर्नाटकची सीमारेषाही निश्चित केली आहे. आजूबाजूला असलेल्या पश्चिम घाटाच्या हिरव्यागार जंगलानं या धबधब्याच्या सौंदर्यात भरच घातली आहे. त्यामुळे दूधसागरला जाणं हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.

 

6) अथिरापिल्ली धबधबा, केरळहा केरळमधला सर्वांत मोठा धबधबा आहे. त्रिसूर जिल्ह्यात वसलेला हा धबधबा 80 फुटांवरु न कोसळतो. कोसळत्या धबधब्याखाली ‘बरसो रे मेघा’ म्हणत नृत्य करणारी ऐश्वर्या राय आठवतीये? ‘गुरु ’ चित्रपटातल्या या गाण्यातला हा धबधबा अथिरापिल्लीचाच आहे. अनेक मल्याळम चित्रपटांच्या शूटिंगसाठी प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण आहे. इथल्या ट्रीपमध्ये तुम्हाला पक्षीनिरीक्षणाचा बोनसही मिळतो. पक्षांच्या अत्यंत दुर्मिळ जाती इथं पहायला मिळतात.

 

7) ठोसेघर धबधबा, महाराष्ट्र

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील हे ठिकाण पावसाळ्यामध्ये पर्यटकांनी गजबजतं. इथे एकच धबधबा नाहीये. छोट्या-मोठ्या धबधब्यांची रांगच तुम्हाला इथे पहायला मिळते. अगदी 15-20 फूट उंचीच्या धबधब्यांपासून 200 फूट उंचीपर्यंतचे धबधबे आहेत. इथं भर पावसाळ्यात जाण्यामध्ये मजा असली तरी अगदी नोव्हेंबरपर्यंतही तुम्ही ठोसेघरला जाऊ शकता. शिवाय ठोसेघरपासून सज्जनगडही जवळ आहे. त्यामुळे ठोसेघर-सज्जनगड अशी मस्त ट्रीप होऊ शकते.

 

 

8) चाचाई धबधबा, मध्य प्रदेशमध्य प्रदेशातला हा सर्वांत उंच धबधबा. तब्बल 430 फूटांवरून हा धबधबा कोसळतो. तामसा नदीची उपनदी असलेल्या बिहड नदीवर हा धबधबा आहे.