शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'मदर मार्केट' इथे फक्त महिला राज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 18:54 IST

कुठल्याही ठिकाणी फिरायला गेल्यावर तुम्हाला तिथल्या मार्केटमध्ये हौसेनं खरेदीला जाणा-या आणि दराबाबत हुज्जत घालताना महिला दिसतीलच. पण तिथल्या विक्रेत्याही महिला असतील असं सहसा होत नाही. पण इम्फाळमधल्या मदर मार्केटमध्ये खरेदीदार आणि विक्रेता दोन्हीही महिलाच आहेत.

ठळक मुद्दे* मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये ‘मदर मार्केट’ या नावानं हा बाजार भरतो. थोडीथोडक्या नाही तर तब्बल 500 वर्षांपासून हा बाजार भरत आहे. पूर्णपणे महिलांचं हे मार्केट कसं अस्तित्वात आलं याची कहाणीही रंजक आहे.* ‘मदर मार्केट’ हे आशियातल्या सर्वांत मोठ्या बाजारांपैकी एक आहे. इथे जवळपास 5000 हून अधिक महिला एकाचवेळी बाजार भरवतात.* या मार्केटच्या माध्यमातून महिला दरमहा 50 हजारांपासून 2 लाख रूपयांची कमाई करत आहेत.

अमृता कदम 

महिलांना प्रवेशबंदी असलेल्या मंदिरांबद्दल तुम्ही ऐकलं-वाचलं आहे. त्याबद्दल ब-याच चर्चा, वाद-विवादही झालेले आहेत. पण भारतात एक जागा अशी आहे जिथे पुरूषांना प्रवेशबंदी आहे. इथे केवळ बायकांचेच राज्य चालते. पण हे मंदिर नाही तर मार्केट आहे. देशाच्या ईशान्येला वसलेल्या मणिपूरची राजधानी इम्फाळ इथे हे मार्केट आहे. खरंतर कुठल्याही ठिकाणी फिरायला गेल्यावर तुम्हाला तिथल्या माकेर्टमध्ये हौसेनं खरेदीला   जाणा-या आणि दराबाबत हुज्जत घालताना महिला दिसतीलच. पण तिथल्या विक्रेत्याही महिला असतील असं सहसा होत नाही. पण इम्फाळमधल्या या मार्केटमध्ये खरेदीदार आणि विक्रेता दोन्हीही महिलाच आहेत.

 

500 वर्षांचा इतिहास

मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये ‘मदर मार्केट’ या नावानं हा बाजार भरतो. थोडीथोडक्या नाही तर तब्बल 500 वर्षांपासून हा बाजार भरत आहे. पूर्णपणे महिलांचं हे मार्केट कसं अस्तित्वात आलं याची कहाणीही रंजक आहे. म्हणजे पुरूषांना इथे येऊ द्यायचं असा काही ठराव झालेला नव्हता. पण मणिपूरमध्ये बहुतांश पुरु ष हे देशाच्या रक्षणासाठी लष्करात भरती झालेले आहेत. देश स्वतंत्र होण्यापूर्वी ब्रिटीश आणि त्याहीआधी राजेरजवाड्यांपासूनची ही परंपरा आहे. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी ही महिलांवरच येऊन पडली. मार्केटमध्ये सातत्यानं महिलांचं वर्चस्व ठसत गेलं. त्यातून पुढे मग ‘फक्त महिला’ हा या मार्केटचा नियमच तयार झाला

आशियातला मोठा बाजार

‘मदर मार्केट’ हे आशियातल्या सर्वांत मोठ्या बाजारांपैकी एक आहे. इथे जवळपास 5000 हून अधिक महिला एकाचवेळी बाजार भरवतात. या बाजारात मासे, भाजी, बांबू आणि धातूपासून बनवलेली विविध शिल्प आणि अन्य वस्तूंची विक्री होते. या मार्केटच्या माध्यमातून महिला दरमहा 50 हजारांपासून 2 लाख रूपयांची कमाई करत आहेत. हा बाजार म्हणजे केवळ खरेदीविक्रीचं केंद्र नव्हे तर महिलांसाठीचे प्रशिक्षण केंद्रही आहे. या बाजाराच्या माध्यमातून अनेक महिला काम करायला शिकल्या आहेत.

एका महाकाय भूकंपानंतर2016 मध्ये इम्फाळमध्ये 6.7 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झालेला होता. या भूकंपात या मार्केटचं खूप मोठं नुकसान झालं. आजूबाजूच्या इमारती आणि घरांचं छप्पर या मार्केटवर कोसळलं होतं. या काळात तुटलेल्या रस्त्यांवरच दुकान लावून या महिलांनी आपली रोजीरोटी कमावली. पण हळूहळू या मार्केटची स्थिती पुन्हा सुधारत असून पुन्हा ते जुन्या रु पात सज्ज होताना दिसतंय.त्यामुळे कधी नॉर्थ इस्टच्या सफरीवर गेलात आणि मणिपूरमध्ये राहण्याचा योग आलाच तर या अनोख्या मार्केटला भेट देण्याची संधी तुम्हाला नक्की मिळेल. अर्थात स्त्री असाल तर... हे यामध्ये ओघानं आलंच.