शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
5
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
6
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
7
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
8
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
9
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ घातलेला फोटो व्हायरल!
10
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
11
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
12
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
13
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
14
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
15
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
16
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
17
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
18
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
20
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यभर ऊर्जा देणारं प्रवासातलं संचित..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 17:25 IST

ते जपून ठेवायलाच हवं..

ठळक मुद्देप्रवासासाठी बाहेर पडल्यानंतर जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघा. कुठलेही पूर्वग्रह तर नकोतच.केवळ प्रसिद्ध गोष्टींवरच लक्ष देण्यापेक्षा तेथील संस्कृती, तेथील लोक, तेथील वैशिष्ट्य, कला, खाद्यसंस्कृती.. या गोष्टी डोळसपणे पाहायला हव्यात.एखाद्या नव्या ठिकाणी गेल्यावर आपल्या जेवणाची आॅर्डर तिथल्याच स्थानिक माणसाला द्यायला सांगून तर पाहा.. नवं मैत्र जुळवण्याची ती पहिली पायरीही ठरेल.

- मयूर पठाडेमौजमजा करण्यासाठी, आपले सारे ताणतणाव विसरण्यासाठी आपण प्रवासाला निघतो, पण खरंच किती जणांना हे पथ्य पाळता येतं. बाहेर पडले तरी आॅफिसमध्ये आता काय असेल, सारी कामं व्यवस्थित होत असतील की नाही, माझ्या घराकडे कोण बघेल.. असंख्य चिंता आणि काळज्यांचं गाठोडं आपण सोबतच बाळगलेलं असतं.त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, एकदा बाहेर पडल्यानंतर नसत्या काळज्यांनी स्वत:चा जीव पोखरून घेऊ नये. त्यापेक्षा आपली ही ट्रिप संस्मरणीय कशी होईल याकडे आपण लक्ष द्यायला हवं. कारण प्रवासातल्या अनेक गोष्टी आपल्याला नव्या ऊर्जा देऊन जातात आणि आयुष्यभर पुरेल असं संचितही त्या आपल्याला पुरवतात.प्रवास संस्मरणीय होण्यासाठी..प्रवासासाठी बाहेर पडल्यानंतर जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघा. कुठलेही पूर्वग्रह तर नकोतच, पण केवळ एखाद्याच गोष्टीवरुन आपलं पूर्ण मतही बनवायला नको.एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील साºया महत्त्वाच्या गोष्टी तर पाहायलाच हव्यात, पण केवळ प्रसिद्ध गोष्टींवरच लक्ष देण्यापेक्षा तेथील संस्कृती, तेथील लोक, तेथील वैशिष्ट्य, त्या त्या ठिकाणची कला, खाद्यसंस्कृती.. या साºयाच गोष्टी डोळसपणे पाहायला हव्यात.एखाद्या नव्या ठिकाणी गेल्यावर आपण हमखास तिथल्या खाद्यपदार्थांची चव घेतोच, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या जेवणाची आॅर्डर तिथल्याच स्थानिक माणसाला द्यायला सांगून तर पाहा.. त्या जेवणाची, त्या पदार्थाची लज्जत आणखीच वाढेल आणि नवं मैत्र जुळवण्याची ती पहिली पायरीही ठरेल.बॅगपॅक करून जगप्रवासाला निघालेली किंवा कायम वेगवेगळ्या ठिकाणांनी भेट देणारे भटके कायम याच ट्रिकचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.निसर्ग आणि तिथली प्रसिद्ध ठिकाणं आपण जशी पाहतो, तशीच त्या ठिकाणची वेगवेगळी माणसंही आपण आवर्जुन पाहिली पाहिजेत. ही माणसं कदाचित तुम्हाला इतकं काही देऊन जातील की नंतर ती तुमच्या आयुष्याचाच एक भाग होऊन जातील.. पुढच्या पिढीतही तो वारसा अधिक बळकट होईल..