शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासाच्या डिजिटल नियोजनात भारतीय प्रवासी लई भारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 18:13 IST

केवळ वाढणारी संख्या एवढंच भारतीय पर्यटकांचं वैशिष्ट्य नाहीये. तर भारतीय पर्यटक हे अतिशय सजग आणि डिजिटली प्रगतही आहेत. वेगवेगळे डिजिटल टूल्स, अ‍ॅप्स वापरून आपल्या प्रवासाचं परफेक्ट नियोजन करण्यात भारतीय पर्यटक जगात आघाडीवर आहेत.

ठळक मुद्दे* 2017 या वर्षांत डिजिटल प्रवाशांच्या यादीत भारतानं पहिलं स्थान मिळवलं आहे.* ‘ट्रॅव्हल कॉमर्स पोर्टल’ या ट्रॅव्हलपोर्टनं केलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.* भारतातून 1000 पर्यटकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. वर्षातून एकदा तरी विमानप्रवास            करणा-याप्रवाशांनी दिलेल्या माहितीचा विचार या सर्वेक्षणासाठी करण्यात आला.

-अमृता कदमआजकाल परदेशी प्रवास करणा-या भारतीय प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. पण केवळ वाढणारी संख्या एवढंच भारतीय पर्यटकांचं वैशिष्ट्य नाहीये. तर भारतीय पर्यटक हे अतिशय सजग आणि डिजिटली प्रगतही आहेत. वेगवेगळे डिजिटल टूल्स, अ‍ॅप्स वापरून आपल्या प्रवासाचं परफेक्ट नियोजन करण्यात भारतीय पर्यटक जगात आघाडीवर आहेत.

‘ट्रॅव्हल कॉमर्स पोर्टल’ या ट्रॅव्हलपोर्टनं केलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.2017 या वर्षांत डिजिटल प्रवाशांच्या यादीत भारतानं पहिलं स्थान मिळवलं आहे. या यादीत चीननं दुसरं स्थान मिळवलं आहे. अनेक परदेशी पर्यटकांची पसंती असलेला इंडोनेशिया या यादीत तिस-या क्र मांकावर आहे.19 देशांतल्या पर्यटकांच्या माहितीवर हे सर्वेक्षण आधारित आहे. प्रवासाचं नियोजन, तिकिट बुकिंग, हॉटेल बुकिंग आणि प्रवासातल्या इतर टप्प्यांवर पर्यटक डिजिटल पर्यायांचा अवलंब कसा करतात याचा संदर्भ घेत ही यादी केली आहे.

 

भारतातून 1000 पर्यटकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. वर्षातून एकदा तरी विमानप्रवास करणा-या प्रवाशांनी दिलेल्या माहितीचा विचार या सर्वेक्षणासाठी करण्यात आला.भारतीय प्रवाशांनी दिलेल्या माहितीचा विचार करता स्मार्टफोन हे सर्वाधिक पसंतीचं डिजिटल डिव्हाइस असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. 82टक्के भारतीय प्रवाशांच्या मते मोबाइल बोर्डिंग पास आणि          इ तिकिट ही जास्त सोयीची असतात.66 टक्के भारतीय वाय-फायसाठी अतिरिक्त शुल्क आकारणा-या हॉटेल्समध्ये बुकिंग करणं टाळतात. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे लांबचे प्रवास करणा-या बहुतांश प्रवाशांना आपल्या कुटुंबियांशी तसंच मित्र-मैत्रिणींशी व्हर्च्युअली कनेक्टेड असण्याची आवश्यकता भासते. त्यामुळेच प्रवासाचं नियोजन करताना कनिक्टिव्हिटीचा विचारही केला जातो.

एकूणच आधुनिक तंत्राचा वापर करत आपल्या प्रवासाचं प्लॅनिंग करण्यात भारतीय प्रवाशांनी आघाडी घेतली आहे, हे नक्की.