शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:ला ओळखायचं असेल तर प्रवासासारखं उत्तम साधन नाही!..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 14:58 IST

प्रवासातून मिळणारं संचित आपल्याला आयुष्यभर पुरतं.

ठळक मुद्देस्वत:ची ओळख प्रवासानं येते.प्रवासात भेटलेल्या लोकांशी जर आपलं मैत्र जुळलं, तर त्या मैत्रीची शिदोरी आपल्याला आयुष्यभर पुरते.आपल्यातले विविध स्किल्स डेव्हलप करण्यासाठी प्रवासासारखा दुसरा मार्ग नाही.भाषेचा व्यासंग सुधारण्यासही प्रवासामुळे मदत होते.

- मयूर पठाडेकोणकोणत्या गोष्टींपासून आपल्याला फार फायदा होतो, हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. त्यासंदर्भातली एक आर्याही खूप प्रसिद्ध आहे..केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचारशास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा येतसे चातुर्य फारम्हणजे काय, तर परदेश प्रवास, पंडितांशी मैत्री, वेगवेगळ्या सभांमधील नामांकित वक्त्यांचे विचार ऐकणं आणि ग्रंथांचं वाचन यामुळे आपल्यात फार चातुर्य, शहाणपण येतं या अर्थाची ही आर्या आहे.यात देशाटन म्हणजेच परदेश प्रवासाचा उल्लेख केला आहे. अर्थात फक्त परदेश प्रवास केल्यानंच तुमच्यात चातुर्य, शहाणपण येतं असं नाही, कुठल्याही प्रवासानं, जग पाहिल्यानं आपल्याला अनेक गोष्टी कळतात. त्यामुळेच नियमितपणे आणि डोळे उघडे ठेऊन प्रवास केला तर ते आपल्या फारच फायद्याचं आहे असा या आर्याचा साधारण आशय..प्रवासाच्या फायद्यांची यादी केली तर ती फारच मोठी होईल. त्यातील काही मोजक्या फायद्यांचा विचार आपण करू. 

प्रवासाचे काय फायदे आहेत?१- प्रवासामुळे आपल्याला ‘दृष्टी’ येते. अनेक गोष्टी आपल्याला लख्खपणे कळतात.२- मुख्य म्हणजे प्रवासात इतक्या गोष्टी आणि इतकी माणसं पाहिल्यामुळे आपण नेमकं कोण आहोत, किती पाण्यात आहोत, आपण काय केलं पाहिजे याची समजही येते. म्हणजेच स्वत:ची ओळख प्रवासानं येते.३- प्रवासात जी निरनिराळी माणसं आपल्याला भेटतात, त्यांच्याशी जर संवाद साधला तर अनेक आश्चर्यकारक आणि महत्वाच्या गोष्टी आपल्याला कळतात. या लोकांशी जर आपलं मैत्र जुळलं, तर त्या मैत्रीची शिदोरीही आपल्याला आयुष्यभर पुरते.४- प्रवासामुळे आपल्यातही आपोआपच सुधारणा होत जाते. अनेक गोष्टी आपल्याला स्वत: कराव्या लागतात. ऐनवेळी निर्णय घ्यावे लागतात. अडचणींतून मार्ग काढावा लागतो. काही वेळा संयमाचीही परीक्षा होते. आपल्यातले विविध स्किल्स डेव्हलप करण्यासाठी प्रवासासारखा दुसरा मार्ग नाही.५- तुम्ही कुठेही जा, पण संस्कृती आणि भाषेतलं वैविध्य तुम्हाला जाणवतंच. अगदी मराठी मुलखातच जरी तुम्ही गेलेला असलात, तरी तिथली बोली भाषा, काही शब्द, बोलण्याचा हेल इत्यादि अनेक गोष्टी पाहायला मिळतात. त्यामुळे भाषेचा व्यासंग सुधारण्यासही मदत होते.६- प्रवास हा खरं म्हणजे एक प्रकारचं अ‍ॅडव्हेन्चरच असतं. अशा अ‍ॅडव्हेन्चरची तुम्हाला प्रवासामुळे सवय होते.प्रवासानं अशा अनेक गोष्टी आपल्याला मिळतात. आपल्याला त्या समृद्ध करतात. त्याविषयी पुढच्या भागात..