शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

विमानाचं तिकिट बुक करण्यासाठी ट्रॅव्हल एजंटकडे जाताय, मग त्याआधी तुम्हाला काही गोष्टी माहिती असायलाच हव्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 18:12 IST

जवळच्या लांबच्या प्रवासासाठी ट्रॅव्हल एजंटकडून विमानाचं तिकिट बुक करताना काही गोष्टीं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यामुळे तुमचा पैसा तर वाचेलच, पण त्यासोबतच ट्रिपचा अधिक चांगल्या पद्धतीनं आनंदही घेता येईल.

ठळक मुद्दे* ट्रॅव्हल एजंटकडून तिकीट बुक करणार असाल तर त्याआधी नेमकं कुठलं तिकीट आपल्या बजेटमध्ये आहे याची थोडीशी चौकशी करा.* तुम्ही स्वत:चा देश सोडून एखाद्या परदेशात फिरायला जात असताना तिथे राहण्याची व्यवस्था नेमकी कशी आहे याची आधीच माहिती घ्या.* ट्रॅव्हल एजंटमुळे कटकट वाचते हे खरं असलं तरी आपण सगळ्याच गोष्टींबद्दल अनभिज्ञ असाल तर तुमच्या अज्ञानाचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो.

- अमृता कदमपर्यटनासाठी जाताना अनेकजण सध्या ट्रॅव्हल कंपन्यांचा पर्याय निवडतात. विमानाचं तिकीट बुक करतानाही काहीजण ट्रॅव्हल एजंटवरच विसंबून असतात. विशेषत: विदेशात जायचं असेल तर डोक्याला कुठला ताप नको म्हणून सरळ याच मार्गाला पसंती दिली जातात. हे काम सोयीचं वाटत असलं तरी ट्रॅव्हल एजंटकडून बुकिंग करताना काही गोष्टीं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यामुळे तुमचा पैसा तर वाचेलच, पण त्यासोबतच ट्रिपचा अधिक चांगल्या पद्धतीनं आनंदही घेता येईल. 

 

1. कुठलं तिकीट सर्वांत स्वस्त आहे?परदेशात जाण्यायेण्यासाठी सध्या भरपूर फ्लाईट उपलब्ध असतात. अनेक विमान कंपन्या स्वस्त आणि सुविधापूर्ण प्रवासाची संधी ग्राहकांना देत असतात. ट्रॅव्हल एजंटकडून तिकीट बुक करणार असाल तर त्याआधी नेमकं कुठलं तिकीट आपल्या बजेटमध्ये आहे याची थोडीशी चौकशी करा. अनेकदा विमान कंपन्या आपल्या प्रवाशांना अशा तिकीटांवर मोठी सूट देत असतात. त्यामुळे ट्रॅव्हल एजंटच्या दारात उभं राहण्याआधी अशी थोडीफार माहिती आधीच जमा करा.

2. तिकीट बुक करण्याची योग्य वेळ

जास्त लांबचा विमान प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही किमान 2 ते 4 महिने तिकीट बुकिंग करणं फायद्याचं आहे. ही बुकिंगची योग्य वेळ तुम्हाला बरीच फायद्याची ठरु शकते. कारण उशीर केलात तर कधी तुम्हाला मनासारखी सीट मिळत नाही, तर कधी एकदम अडनिड्या वेळेचीच फ्लाईट बुक करण्याची वेळ येऊ शकते.

3. प्लॅन बदललाच तर तिकीट रद्द कसं कराल?

यात्रेची सगळी तयारी पूर्ण झालीये, तिकीट पण बुक झालंय. पण अचानक एखाद्या अपरिहार्य कारणामुळे तुम्हाला तुमचा प्लॅन बदलण्याची वेळ येऊ शकते. पण अशी वेळ आलीच तरी अगदी घाबरु न जाऊ नका. तुम्हाला तुमचं तिकीट रद्द करु न पैसे परत मिळू शकतात. ही तिकीट रद्द करण्याची प्रक्रि या तुम्हाला आधीपासूनच माहिती असू द्या. अनेक विमान कंपन्यांचं लांबच्या प्रवासाचं तिकीट हे 24 तास आधी रद्द होऊ शकत नाही. त्यामुळे ही प्रक्रि या तुमच्या लक्षात असू द्या.

4. मुक्कामाची जागा व्यवस्थित आहे का?

तुम्ही स्वत:चा देश सोडून एखाद्या परदेशात फिरायला जात असताना तिथे राहण्याची व्यवस्था नेमकी कशी आहे याची आधीच माहिती घ्या. एअरपोर्टपासून हॉटेलमधलं अंतर किती आहे, तिथे पोहचण्यासाठी किती वेळ लागतो या गोष्टी आधीच माहिती असायला हव्यात. योग्य रस्ता निवडलात तर तुमचा वेळ वाचेल आणि पुरेशी विश्रांती घेऊन तुम्ही तुमच्या पर्यटनाचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीनं लुटू शकता. 

5. फिरण्यासाठी कुठली जागा योग्य आहे?

विदेशात गेल्यावर तुम्ही तो देश पाहायला परत परत जाऊ शकणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तिथे गेल्यावर नेमकं काय पाहायचंय, तिथली उत्तम पर्यटनस्थळं कुठली आहेत याची माहिती घ्या. तुमच्या आवडीनिवडीनुसार अशा स्थळांची यादी करून त्याचा नकाशाही सोबत ठेवलात तर तुम्हाला तिथल्या अंतराचा अंदाज घेऊन ट्रिप व्यवस्थित प्लॅन करता येईल. विदेशात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पाहून व्हावं यासाठी जी जागा सर्वात चांगली, तुमच्या आवडीची आहे तिथे पहिल्यांदा पोहचा.ट्रॅव्हल एजंटमुळे कटकट वाचते हे खरं असलं तरी आपण सगळ्याच गोष्टींबद्दल अनभिज्ञ असाल तर तुमच्या अज्ञानाचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो. म्हणूनच आधी बेसिक माहिती करु न घ्या आणि मगच ट्रॅव्हल एजंटकडे जा.